इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील जवळपास अर्धे सामने संपले आहेत. अशात आयपीएलच्या १५व्या हंगामातील प्लेऑफ सामन्यांबाबत मोठी बातमी समोर येत आहेत. शनिवारी (दि. २३ एप्रिल) बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्लेऑफच्या सामन्यांबद्दल माहिती दिली. (IPL 2022 Final Playoff Matches)
सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी प्लेऑफ सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथे आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, त्यांनी हेही सांगितले की, यादरम्यान दर्शकांच्या संख्येवर कोणतेही बंधन नसेल.
आयपीएल २०२२मधील पहिला प्लेऑफ सामना २४ मे आणि एलिमिनेटर सामना २६ मे रोजी कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा प्लेऑफ सामना २७ मे रोजी आणि अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळला जाईल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महिला टी२० चॅलेंजर्सचीही केली घोषणा
इतकेच नाही, तर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावर्षी महिला टी२० चॅलेंजर्सच्या तारखांचीही घोषणा केली. महिला टी२० चॅलेंजर्सचे सामने २४ ते २८ मे दरम्यान ३ संघांमध्ये खेळवले जातील. हे सर्व सामने लखनऊच्या स्टेडिअममध्ये पार पडतील.
आनंदाची बाब अशी की, दीर्घ काळानंतर आयपीएलच्या सामन्यांसाठी १०० टक्के दर्शकांना एन्ट्री मिळेल. कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या आयपीएलची सुरुवात २५ टक्के दर्शकांच्या उपस्थितीत झाली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात ही टक्केवारी २५वरून ५०वर करण्यात आली होती. कोरोनामुळे यंदाच्या आयपीएल हंगामातील सामने महाराष्ट्रातील चार स्टेडिअममध्ये खेळवले जात आहेत. मुंबईच्या ३ स्टेडिअम आणि पुण्याच्या १ स्टेडिअमवर हे साखळी सामने खेळले जात आहेत. सर्व संघ बायो-बबलमध्ये राहून सामने खेळत आहेत.
मात्र, असे असूनही दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कँपमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे त्यांच्या २ महत्त्वाच्या खेळाडूंसह ६ सदस्य कोरोनाग्रस्त झाले होते. विशेष म्हणजे, मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांचे कुटुंबही कोरोनाच्या तावडीत सापडले होते. त्यामुळे शुक्रवारी (दि. २२ एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रिकी पाँटिंग आपल्या दिल्ली संघाच्या डगआऊटमध्ये उपस्थित नव्हते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नो बॉल वादावर राजस्थानच्या प्रशिक्षकांनी सोडले मौन; म्हणाले, ‘पंच खेळाला नियंत्रित करतात’
आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ, गुजरातचा शेवटच्या षटकात रोमांचक विजय
Video: अवघे काही मीटर कमी पडले, नाहीतर बटलरने वानखडे स्टेडियमच्या बाहेर मारला असता षटकार