इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली याचं नाव अग्रस्थानी येते. त्याने धावांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. मात्र, या हंगामात अपेक्षित प्रदर्शन करण्यात तो अपयशी ठरताना दिसत आहे. अशात शुक्रवारी (दि. १३ मे) पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराटने छोटेखानी खेळी केली. यानंतर चौथ्या षटकात लवकर तंबूत परतताना विराट भलताच चिडलेला दिसला. यादरम्यानचा त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत २०९ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाची पळता भुई थोडी झाली. बेंगलोरच्या पहिल्या ३ विकेट या ७ षटकातच पडल्या. त्यावेळी धावफलकावर त्यांच्या ५३ धावा होत्या. या ३ विकेट्समधील महत्त्वाची आणि पहिली विकेट होती विराट कोहली (Virat Kohli) याची.
पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोर संघाला विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) यांनी चांगली सुरुवात दिली होती. त्यांची फलंदाजी पाहून असे वाटले की, हे दोघे संघासाठी मोठी भागीदारी रचतील. डावातील ३.१ षटकानंतर बेंगलोर संघाने एकही विकेट न गमावत ३३ धावा केल्या होत्या. मात्र, चौथ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर कागिसो रबाडाने टाकलेला चेंडू विराटने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू त्याच्या शरीराला लागून शॉर्ट फाईन लेगवर उभ्या असलेल्या राहुल चाहरकडे गेला. मात्र, मैदानावरील पंचांनी विराटला बाद घोषित केले नाही. त्यावेळी पंजाबने यानंतर रिव्ह्यू घेतला.
‘मी आणखी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं?’
या रिप्लेमध्ये स्पष्ट दिसले होते की, चेंडू पहिल्यांदा विराटच्या ग्लोव्ह्जला लागला आणि त्यानंतर खेळाडूकडे गेला. अशाप्रकारे विराटला तिसऱ्या पंचांनी बाद घोषित केले. यावेळी विराटने १४ चेंडू खेळून २० धावा केल्या होत्या. तो जसा बाद झाला, तसे तो आकाशाकडे पाहून काहीतरी बोलताना दिसला. त्याच्या लिप सिंकवरून असे दिसले की, तो “मी आणखी काय केलं पाहिजे?” विराटला असे पाहून त्याचे चाहतेही दु:खी झाले. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
"What else you want me to do , f**k me" 😭🙏 na man don't give up @imVkohli
God was never kind to you , it's all ur hardwork nd fighting spirit . https://t.co/XQtRoO98cy
— “ (@KohlifiedGal) May 13, 2022
Like Virat, I too have been asking the same thing to God for the last two years.
"What else do you want me to do? Fu*k me." pic.twitter.com/j2701I0VQ5
— Emotional Black-Male 👨🏽 (@i_akp_30) May 13, 2022
What else do you want me to do, f*ck me – Virat Kohli#ViratKohli𓃵 @RCBTweets #RCBvsPBKS pic.twitter.com/D72XbI5cCE
— Tarak_Deepu (@Tarak_Deepu999) May 13, 2022
God Whyyy are you doing so much wrong to this man ? 😭#RCBvsPBKS pic.twitter.com/BPW70QwFBV
— 𝓼. (@Kohlistiano) May 13, 2022
https://twitter.com/VarmaFan1/status/1525155320796172290?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1525155320796172290%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fipl-2022-virat-kohli-became-angry-with-god-99703
https://twitter.com/VishaI_18/status/1525151673999454210?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1525151673999454210%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fipl-2022-virat-kohli-became-angry-with-god-99703
विराट बाद झाल्यानंतर पंजाबची मालकीण प्रीती झिंटा भलतीच आनंदी झाली. विराटनंतर बेंगलोर संघाच्या विकेट्स नियमित अंतराने पडत राहिल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिस अवघ्या १०, तर महिपाल लोमरोर ६ धावा करून ऋषी धवनच्या गोलंदाजीवर बाद झाले. ग्लेन मॅक्सवेल ३५ आणि रजत पाटीदार २६ यांनाच २० धावांचा आकडा पार करता आला. खराब फलंदाजीमुळे बेंगलोर संघाला निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत फक्त १५५ धावाच करता आल्या. त्यामुळे बेंगलोरला या सामन्यात ५४ धावांनी पराभूत व्हावे लागले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
विराटच्या आयपीएलमधील ६५०० धावा पूर्ण
विराट कोहलीने या सामन्यात जरी २० धावा केल्या असल्या, तरीही त्याने या सामन्यात पहिली धाव घेताच आयपीएल इतिहासात एक मोठा विक्रम रचला. त्याने आयपीएलमधील त्याच्या वैयक्तिक ६५०० धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू बनला. इतकेच नाही, तर त्याच्या टी२० क्रिकेटमधील १०,५०० धावाही पूर्ण झाल्या. अशी कामगिरी करणाराही तो पहिला भारतीय खेळाडू बनला.