मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात शुक्रवारी (६ मे) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये आमना- सामना झाला. मुंंबई इंडियन्सला या सामन्यात सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिली, पण मध्यक्रमात त्यांचे फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे दिसले, तर दुसरीकडे गुजरात टायटन्साच मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा एका खास कारणास्तव चर्चेत आला आहे. नेहराने चालू सामन्यात खेळाडूंना काही सुचना केल्यामुळे तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.
आशिष नेहरा (Ashish Nehra) त्याच्या संघाचा सामना सुरू असताना खूप सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. याचदरम्यान, त्याने गुजरातच्या गोलंदाजीवेळी संघातील खेळाडूंना महत्वाच्या विकेटसाठी डीआरएस घेऊ नका असे खुनावले आणि संघानेही तसेच केले. सोशल मीडियावर याच कारणास्तव वाद निर्माण आझा आहे. नेटकरी आशिष नेहराच्या या कृत्याला लज्जास्पद म्हणत आहेत, कारण हे आयपीएलच्या आचार संहितेच्या नियमांचे उल्लंघन आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई इंडियन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. मुंबईच्या डावातील १३व्या षटकात कायरन पोलार्ड (Kieron Pollard) विरुद्ध पायचीतविरुद्ध अपील करण्यात आली. परंतु पंचांनी त्याला दाद दिली नाही. यानंतर दिल्ली कॅपिटल्स डीआरएस घेण्याच्या विचारत दिसत होता, पण त्यांच्या मुख्य प्रशिक्षकांनी केलेल्या एका इशाऱ्यामुळे त्यांनी डीआरएस घेतला नाही. गुजरातच्या डगआऊटजवळ उपस्थित असलेला आशिष नेहराने इशारा केला की, चेडू स्टंपच्या वरून जात आहे आणि याच कारणास्तव संघाने डीआरएस घेतला नाही.
क्रिकेटच्या नियमांप्रमाणे डीआरएस घेण्याचा निर्णय हा कर्णधाराने घ्यायचा असतो. यासाठी कर्णधार मैदानात उपस्थित खेळाडूंशी चर्चा करू शकतो, पण १५ सेकंदाच्या आत त्याला निर्णय कळवावा लागतो. कर्णधाराला मैदानाबाहेरील कोणत्याच व्यक्तीची मदत घेता येत नाही. आशिष नेहराने खेळाडूंना डीआरएसविषयी केलेल्या इशाऱ्यामुळे नेटकरी त्याच्यावर संतापल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
https://twitter.com/SirDindaTweet/status/1522594308838227968?s=20&t=2d-lla5Jg_-ococd7WLpcA
Nehra is indicating from outside that this ball is going up, don't take DRS?🤣🤣
— ` (@kurkureter) May 6, 2022
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १७७ धावा चोपल्या आणि गुजरातपुढे १७८ धावांचे आव्हान उभे केले होते. हे आव्हान गुजरात संघाला पार करता आले नाही. त्यांना ५ विकेट्स गमावत फक्त १७२ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने ५ धावांनी सामना खिशात घातला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेकॉर्ड ब्रेक मॅच! गुजरात- मुंबई सामन्यामध्ये रचले गेले ‘हे’ ११ विक्रम, टाका एक नजर
‘टेबल टॉपर’वर भारी पडली मुंबई इंडियन्स, गुजरातच्या फलंदाजाच्या नाकी नऊ आणत ५ धावांनी मिळवला विजय