आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आगामी आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणार आहे. मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीशी झगडणारा हार्दिक सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस टेस्टच्या प्रक्रियेतून जात आहे. आगामी आयपीएल हंगामात त्याच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर असणार आहे. आयपीएमध्ये खेळताना कोणत्या विचारासह तो गुजरातचे नेतृत्व करणार आहे, याचा खुलासा हार्दिकने केला आहे.
मागच्या मोठ्या काळापासून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) फिटनेसच्या कारणास्तव गोलंदाजी करू शकलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिकला रिलीज केले आणि गुजरात टायटन्से (Gujarat Titans) १५ कोटी रुपयांमध्ये त्याला संघात सामील केले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) हार्दिकने फिटनेस टेस्ट पास केली असली, तरी त्याच्या प्रदर्शनावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. खासकरून त्याच्या गोलंदाजी पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत.
गुजरात टायटन्सने काही दिवसांपूर्वी त्यांची जर्सी लॉन्च केली. या कार्यक्रमादरम्यान हार्दिकने सांगितले की, तो कशाप्रकारे संघातील युवा खेळाडूंना प्रोत्साहित करणार आहे. जेव्हा संघाचे यश साजरी करण्याची वेळ येईल त्यावेळी, त्याची भूमिका काय असेल, याविषयी हार्दिकने खुलासा केला आहे.
हार्दिकने सांगितले की, “या हंगामात यश संघाचे असेल, पण अपयश हे माझे असेल.” हार्दिकच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांनी त्याचे चांगलेच कौतुक केले आहे. गुजरात टायटन्सने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही व्हिडिओ क्लीप पोस्ट केली आहे.
Boht Hard, captain! 🤘😎
Apna time aa gaya…#GujaratTitans #SeasonOfFirsts pic.twitter.com/fM4dTGxsDN— Gujarat Titans (@gujarat_titans) March 17, 2022
दरम्यान, आगामी आयपीएल हंगाम २६ मार्चला सुरू होणार असून चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पहिला सामना असणार आहे. गुजरात टायटन्सचा पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्ससोबत असेल, जो २८ मार्च रोजी खेळला जाईल. गुजरात संघ सीएसके, आरसीबी, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादसोबत ग्रुप बीमध्ये आहे.
गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ –
हार्दिक पंड्या (कर्णधार), राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, राहुल तेवतिया, शुबमन गिल, डेविड मिलर, साई किशोर, अभिनव सदरंगानी, मैथ्यू वेड, अल्जारी जोसेफ, रहमानुल्लाह गुरबेज, ऋद्धिमान साहा, जयंत यादव, विजय शंकर, डोमिनक ड्रॅक्स, वरुण एरॉन, गुरकीरत सिंह, नूर अहमद, दर्शन नलकंडे, प्रदीप सांगवान.
महत्वाच्या बातम्या –
एमएस धोनीच्या ७ वर्षीय लेकीचे गंगा स्नान, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत १२ संघांचा सहभाग