मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर बुधवारी (२० एप्रिल) पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आमना- सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ९ विकेट्सने विजय मिळवला आणि तब्बल ९.३ षटके देखील शिल्लक ठेवली. पंजाब किंग्जला स्वस्तात गुंडाळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने मिळालेले छोटे लक्ष्य सहज गाठत विजय मिळवला. यादरम्यान दिल्ली संघाने एक खास विक्रम देखील केला.
नाणेफेक गमावल्यामुळे पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संपूर्ण संघ अवघ्या ११५ धावा करून सर्वबाद झाला. पंजाबने संपूर्ण २० षटके खेळून काढली, पण संघाला अपेक्षित धावसंख्या उभी करता आली नाही. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने पावरप्लेच्या ६ षटकांमध्ये तब्बल ८१ धावा कुटल्या आणि विक्रमाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सने आजपर्यंतच्या इतिहासात पावर प्लेमध्ये केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाब किंग्जविरुद्ध हा विक्रम नोंदवण्यापूर्वी आयपीएल २००८ मध्ये पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेगलोरला पावर प्लेमध्ये ७१ धावा ठोकल्या होत्या. हा सामना या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्जचा २०११ साली झालेला सामना. या सामन्यात दिल्लीच्या संघाने पावर प्लेमध्ये ७० धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध २०१० साली दिल्लीने पावर प्लेमधील चौथे सर्वोत्तम प्रदर्शन केले होते. या सामन्याच्या पावर प्लेमध्ये दिल्लीने ६९ धावा केल्या होत्या.
दरम्यान, उभय संघातील बुधवारी खेळल्या गेगेल्या या सामन्याचा विचार केला, तर दिल्लीच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले आणि विरोधी संघाला अवख्या ११५ धावांवर गुंडाळले. त्यानंतर प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स जेव्हा मैदानात आला, तेव्हा त्यांनी १ विकेट्सच्या नुकसानावर आणि १०.३ षटकातच विजय मिळवला. दिल्लीचा सलामीवीर डेविड वॉर्नरने अवघ्या ३० चेंडूत ६० धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. यासह दिल्ली संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानी भरारी घेतलीये.
पावरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने सर्वाधिक धावा केलेले सामने
दिल्ली (८१ धावा) विरुद्ध पंजाब (२०२२)*
दिल्ली (७१ धावा) विरुद्ध आरसीबी (२००८)
दिल्ली (७० धावा) विरुद्ध पंजाब (२०११)
दिल्ली (६९) विरुद्ध मुंबई इंडियन्स (२०१०)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी बूम बूम बुमराहने गाळला घाम; ट्रेनिंगदरम्यानचा खास व्हिडिओ व्हायरल
मुंबईचा सूर्य बुडताना पाहून रोहितला आठवला ‘हा’ वेगवान गोलंदाज; केली संघात सामील करण्याची मागणी?