शनिवारी (२१ मे) आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी लढत पाहायला मिळाली. मुंबईने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि एक महत्वाचा विक्रम देखील नावावर केला.
मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात तीन विकेट्स घेऊ शकला. त्याने टाकलेल्या चार षटकांमध्ये २५ धावा खर्च करून या तीन महत्वाच्या विकेट्स नावावर केल्या. त्याने घेतलेल्या विकेट्समध्ये मिचेल मार्श, पृथ्वी शॉ आणि रोवमन पॉवेल यांचा सहभाग होता. या अप्रतिम प्रदर्शनानंतर बुमराह आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा एका सामन्यात तीन विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेणाऱ्यांमध्ये बुमराह आणि श्रीलंकन दिग्गज लसिथ मलिंगा संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर आहेत. मलिंगा आणि बुमराहने प्रत्येकी १९ आयपीएल सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर या यादीत नाव येते ते अमित मिश्राचे, ज्याने १७ आयपीएल सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्यानंतर ड्वेन ब्रावो आणि उमेश यादव देखील एकाच पायरीवर आहेत. या दोघांनी देखील प्रत्येकी १६ आयपीएल सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात बुमराहव्यतिरिक्त मुंबईसाठी रमणदीप सिंग दोन षटकात तब्बल २९ धावा खर्च केल्या आणि दोन विकेट्स नावावर केल्या. मयंक मार्कंडेय आणि डॅनियल सॅम्स यांनी प्रत्येकी १ विकेट नावावर केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा केल्या. यामध्ये रॉवमेन पॉवेल आणि कर्णधार रिषभ पंतने सर्वाधिक योगदान दिले. पॉवेल ४३ धावा करून बाद झाला, तर पंतने ३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा सलामीवीर इशान किशन खेळला, पण रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. रोहितने २ तर इशानने ४८ धावांचे योगदान दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-






