इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या साखळी फेरीचे सामने आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहेत. साखळी फेरीतील अवघे काही सामने खेळले जायचे बाकी आहेत आणि या सामन्यांनंतर प्लेऑफचे चित्र स्पष्ट होईल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही दिग्गज संघ चालू हंगामात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, तर दुसरीकडे गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवख्या संघांनी मात्र सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. चाल तर जाणून घेऊया प्लेऑफचे समीकरण.
दोन नवीन संघ गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२मध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. गुणतालिकत हे दोन्ही संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गुजरातने पहिल्या १० पैकी फक्त २ सामन्यात पराभव स्वीकारला आहे, तर लखनऊने पहिल्या १० पैकी तीन सामने गमावले आहेत. गुजरात १६ गुणांसह पहिल्या, तर लखनऊ १४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. गुजरातने जर अजून एक सामना जिंकला, तर प्लेऑफमधून त्यांना कोणीच बाहेर काढू शकणार नाही. दुसरीकडे लखनऊला प्लेऑपमध्ये जागा पक्की करण्यासाठी राहिलेल्या चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकणे गरजेचे असेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Rajasthan Royals And Royal Challengers Bangaloe) या दोन्ही संघांकडे सध्या प्रत्येकी १२ गुण आहेत आणि गुणतालिकत ते अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. आरसीबीने त्यांचे राहिलेले तिन्ही सामने जिंकले, तर त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते. तसेच, राजस्थानला देखील त्यांचे राहिलेल्या चार पैकी तीन सामने जिंकणे आवश्यक असणार आहे. जर दोन्ही संघांनी राहिलेल्या सामन्यांपैकी तीन सामने जिंकले, तर त्यांच्याकडे प्रत्येकी १८ गुण होतील आणि प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान पक्के होईल.
गुणतालिकेत पहिल्या चार संघांनंतर दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज अनुक्रमे ५, ६ आणि ७व्या क्रमांकावर आहेत. आठव्या क्रमांकावरील कोलताना नाईट रायडर्सकडे ८ गुण आहेत आणि त्यांच्याकडे देखील प्लेऑफमध्ये जागा बनवण्याची संधी आहे. या चारही संघांनी प्रत्येकी १० सामने खेळले आहेत. अशात यांच्यातील जो संघ राहिलेले सर्वच्या सर्व सामने जिंकू शकेल, तो प्लेऑपफमध्ये देखील जागा पक्की करू शकतो. असे असले, तरीही केकेआरला मात्र थोडा संघर्ष करावा लागेल, यात वाद नाही.
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स गुणतालिकेत ६ आणि २ गुणांसह अनुक्रमे ९ आणि १०व्या क्रमांकावर आहेत. हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले असले, तरी इतर संघांच्या अडचणी मात्र यांच्यामुळे वाढू शकतात. सीएसकेला अजून ४, तर मुंबईला ५ सामने खेळायचे आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू पुढच्या वर्षी गुजरातमध्ये येऊ शकतो’, हार्दिक पंड्याची मुंबईच्या जुन्या सहकाऱ्याला खुली ऑफर
वॉर्नरने सामनावीर पुरस्कार जिंकताच साधली ‘हिटमॅन’ची बरोबरी, तर धोनी पडला मागे