---Advertisement---

‘व्यक्तिगत दुश्मनी है, बदला तो हम लेंगे ही’, कोलकाताविरुद्ध कुलदीपच्या अफलातून गोलंदाजीनंतर मीम्सचा महापूर

On: शुक्रवार, एप्रिल 29, 2022 4:42 PM
Kuldeep-Yadav
---Advertisement---

गुरुवारी (२८ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आमना- सामना झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने चार विकेट्सने जिंकला. दिल्लीच्या विजयात त्यांचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले. कुलदीपने घेतलेल्या चार विकेट्ससाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. केलेआरविरुद्धच्या या जबरदस्त प्रदर्शनानंतर सोशल मीडियावार सर्वत्र त्याची चर्चा होत आहे.

एखाद्या खेळाडूला जर त्याच्या संघातून बाहेर केले गेले असेल, तर त्याचे संघाविरुद्ध चांगले प्रदर्शन करण्याची त्या खेळाडूची अपेक्षा असते. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने शुक्रवारी हीच इच्छा हंगामात दुसऱ्यांदा प्रत्यक्षात उतरवली. आयपीएल २०२२मध्ये दिल्ली विरुद्ध कोलकाता या पहिल्या सामन्यात कुलदीप यादवने टाकलेल्या ४ षटकात ३५ धावा खर्च करून ४ विकेट्स नावावर केल्या होत्या. त्यानंतर उभय संघातील हंगामातला दुसरा सामना गुरुवारी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. यावेळी कुलदीपने तीन षटके गोलंदाजी केली आणि १४ धावा खर्च करून ४ विकेट्स नावावर केल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

केकेआरविरुद्ध हंगामातील दुसऱ्या सामन्यात कुलदीपने दिल्लीसाठी ज्या चार विकेट्स घेतल्या, त्या अत्यंत महत्वाच्या होत्या. बाबा इंद्रजीत, सुनील नारायण, श्रेयस अय्यर आणि आंद्रे रसेल, या चौघांना कुलदीपने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. या प्रदर्शनानंतर कुलदीपने त्याचा जुना संघ केकेआरला एकप्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. त्याचे हे प्रदर्शन पाहून केकेआरचे संघ व्यवस्थापन देखील निराश असावे. सोशल मीडियावर सध्या कुलदीप यादवचे कौतुक आणि केकेआरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

दरम्यान, उभय संघात गुरुवारी पार पडलेल्या या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सने ९ विकेट्सच्या नुकसानावर १४६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष्य ६ विकेट्सच्या नुकसानावर आणि एक षटक शिल्लक ठेऊन जिंकले.

या सामन्यात गोलंदाजांचे प्रदर्शन अप्रतिम राहिले. दिल्ली कॅपिटल्ससाठी कुलदीपने ४ विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर रहमानने चार षटकात १८ धावा खर्च करून ४ विकेट्स नावावर केल्या. केकेआरसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवने चार षटकात २४ धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक ३ विकेट्स नावावर केल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

पहिल्याच षटकात फिंचला क्लिन बोल्ड केल्यानंतर सकारियाचे ‘गोकू स्टाईल’ सेलिब्रेशन, तुम्हीही पाहा

मैत्री असावी तर ‘कुलचा’ सारखी! चहलसोबतच्या पर्पल कॅपच्या शर्यतीबाबत कुलदीपची मन जिंकणारी प्रतिक्रिया

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---