रविवारी (१५ मे) डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सला मात दिली. राजस्थानने हा सामना २४ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थानच्या डावाचा शेवट जिमी निशम आणि रविचंद्रन अश्विन करेल अशी अपेक्षा होती. परंतु तसे होऊ शकले नाही. डावाच्या १८ व्या षटकात अश्विनच्या एका चुकीमुळे निशमला विकेट गमवावी लागली.
उभय संघातील हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. जिमी निशम (Jimmy Neesham) १२ चेंडूत १४ धावा करून धावबाद झाला. स्ट्राइकवर असेलेल्या अश्विनने त्याला धाव घेण्यासाठी बोलावले, पण नंतर त्याचा निर्णय बदलला. चेंडू गोलंदाजाच्या हातात लवकर जाणार असल्याचे समजताच रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) जागेवर उभा राहिला, पण तोपर्यंत निशम मात्र खेळपट्टीच्या आर्ध्यात आला होता. निशम या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि डावाचा शेवट देखील करू शकत होता. परंतु अश्विनच्या एका चुकीमुळे त्याला अपेक्षित खेळी करता आली नाही.
Ashwin survives 😅
Neesham walks back ☹️— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 15, 2022
Ashwin OUT or Neesham? A mix-up costs RR https://t.co/oV54IpLeCl
— Jhuma Kar (@JhumaKar14) May 16, 2022
या षटकात रवी बिश्नोई गोलंदाजी करत होता. षटकातील चौथ्या चेंडूवर निशमने विकेट गमावली. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने चपळाई दाखवल्यामुळे निशमला विकेट गमावावी लागली. राहुलने नॉन स्ट्राइक एंडवर उभा असलेल्या बिश्नोईच्या हातात चेंडूल वेळेत पोहोचवला आणि निशमचा डाव देखील संपवला. ज्याच्यामुळे निशमला विकेट गमवावी लागली. तर अश्विनने ७ चेंडूत नाबाद १० धावा केल्या.
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ६ विकेट्सच्या नुकसानावर १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १५४ धावा करू शकला. परिणामी राजस्थानने २४ धावांनी हा सामना जिंकला. राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने चार षटकात १८ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या आणि यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! पुण्यात होणाऱ्या महिला आयपीएलसाठी तीन संघांतील खेळाडूंची घोषणा, ‘या’ तिघींकडे कर्णधारपद
जबराट! बटलर-परागने मिळून बाऊंड्रीजवळ अफलातून कॅच घेत कृणालला धाडले माघारी, पाहा Video