पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात २३ वा सामना बुधवारी (१३ एप्रिल) होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होणार आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल, तर त्यापूर्वी संध्याकाळी ७ वाजता या सामन्यासाठी नाणेफेक पार पडेल. दरम्यान, या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.
असा असू शकतो मुंबई इंडियन्सचा संभावित ११ जणांचा संघ
सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सचा संघ विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यांनी या हंगामात खेळलेल्या आत्तापर्यंतच्या चार सामन्यांपैकी चारही सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे आता मुंबईला पाचव्या सामन्यातून विजयाची आस असेल.
या सामन्यासाठी मुंबईच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल विचार करायचा झाल्यास कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) इशान किशन सलामीला उतरताना दिसू शकतात, तर मधल्या फळीतील जबाबदारी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मावर असू शकते. तसेच अष्टपैलू म्हणून कायरन पोलार्डसह या सामन्यासाठी फॅबियन ऍलेनला संघी दिली जाऊ शकते. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मुरुगन अश्विन बासिल थंम्पीसह जयदेव उनाडकट किंवा टायमल मिल्स यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
मुंबई इंडियन्सचा संभावित ११ जणांचा संघ – रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलेन, जसप्रीत बुमराह, मुरुगन अश्विन बासिल थंम्पी, जयदेव उनाडकट/टायमल मिल्स.
असा असू शकतो पंजाब किंग्सचा संभावित ११ जणांचा संघ
पंजाब किंग्सने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये संमिश्र कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांपैकी २ सामने जिंकले आहेत, तर २ सामना पराभूत झाले आहेत. आता त्यांना पाचवा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे. विजयासाठी आसूसलेल्या मुंबई इंडियन्सला ५ वा पराभवाचा धक्का देण्याचं आव्हान मयंक अगरवालच्या नेतृत्त्वातील पंजाब किंग्सला असणार आहे.
या सामन्यासाठी पंजाबच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल विचार करायचा झाल्यास संघात फार बदल होण्याची शक्यता नाही. त्यांच्याकडून सलामीला मयंक अगरवाल आणि शिखर धवन ही जोडी उतरेल, तर मधल्या फळी जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान हे जबाबदारी सांभाळू शकतात. ओडीयन स्मिथला अष्टपैलूची भूमिका निभावयला लागू शकते. तसेच गोलंदाजीत पंजाबकडे कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि वैभव अरोरा यांसारखे पर्याय आहेत.
पंजाब किंग्सचा संभावित ११ जणांचा संघ – मयंक अगरवाल, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडीयन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग, वैभव अरोरा.
अशी असू शकते ड्रीम ११
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात (Mumbai Indians vs Punjab Kings) होणाऱ्या सामन्यासाठीच्या फँटसी ११ चा विचार करायचा झाल्यास फलंदाज म्हणून शिखर धवन, मयंक अगरवाल, तिलक वर्मा, लियाम लिविंगस्टोन आणि सूर्यकुमार यादवला ड्रीम इलेव्हनमध्ये घेऊ शकता. याव्यतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून जॉनी बेअरस्टो उत्तम पर्याय ठरू शकेल. अष्टपैलू म्हणून तुम्ही कायरन पोलार्डला संधी देऊ शकता. तो मागच्या सामन्यात चालला नसला, तरी पोलार्ड गोलंदाजी आणि फलंदाजीत धुमाकूळ घालण्याची ताकद ठेवतो.
तसेच, गोलंदाजी फळीसाठी कागिसो रबाडा, बासिल थम्पी, मुरुगन अश्विन, राहुल चाहर या ड्रीम इलेव्हनमध्ये एकदम फिट बसू शकतात. या खेळाडूंमध्ये तुम्ही मागच्या सामन्यात धुमाकूळ घालणाऱ्या सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवू शकता, तर लियाम लिविंगस्टोनला उपकर्णधार करू शकता.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (MI vs PBKS) ड्रीम ११
कर्णधार – सूर्यकुमार यादव
उपकर्णधार – लियाम लिव्हिंगस्टोन
यष्टीरक्षक – जॉनी बेअरस्टो
फलंदाज – शिखर धवन, मयंक अगरवाल, तिलक वर्मा, लियाम लिविंगस्टोन, सूर्यकुमार यादव
अष्टपैलू – कायरन पोलार्ड
गोलंदाज – कागिसो रबाडा, बासिल थम्पी, मुरुगन अश्विन, राहुल चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
Video: ‘कॅप्टनकूल’च्या रणनीतीमध्ये फसला विराट; पुल शॉट मारायच्या नादात ‘अशी’ दिली विकेट
IPL 2022| चेन्नईने ‘या’ विक्रमात अव्वलस्थानी असलेल्या बेंगलोरला गाठलेच! मुंबई-पंजाब अद्याप खूप दूर
IPL 2022| पहिल्या विजयाची आस असलेल्या मुंबईसमोर पंजाबचे आव्हान; केव्हा-कुठे होणार सामना, घ्या जाणून