मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शनिवारी डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळवला जाणार आहे. या दिवसातला पहिला सामना हंगामातील २६ वा सामना असणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सचा हा सहावा सामना असणार आहे, तसेच लखनऊ सुपर जायंट्सचाही हा सहावाच सामना आहे.
मुंबई इंडियन्स सध्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात संघर्ष करताना दिसत आहे. त्यांना अद्याप या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. तसेच लखनऊची कामगिरी चांगली झाली असून त्यांना ५ सामन्यांपैकी ३ सामन्यांत विजय मिळवण्यात यश आले आहे.
असे असू शकतात संभावित संघ
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला पहिल्या ५ सामन्यांत पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे पहिल्या विजयाची मुंबईला आस आहे. आता त्यांना हंगामातील सहावा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी मुंबईच्या संभावित प्लेइंग इलेव्हनबद्दल (MI predicted XI) विचार करायचा झाल्यास मोठा बदल दिसण्याची शक्यता कमी आहे.
मुंबईकडून इशान किशन आणि कर्णधार रोहित सलामीला उतरू शकतात. तसेच मधली फळी डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव हे सांभाळू शकतात. तसेच कायरन पोलार्ड हा अष्टपैलू म्हणून चांगला पर्याय असेल. त्याचबरोबर फॅबियन ऍलेनलाही संधी मिळू शकते. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहसह मुरुगन अश्विन टायमल मिल्स यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर जयदेव उनाडकट किंवा बासिल थंपी यांच्यापैकी एकाची निवड प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकते.
केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने आत्तापर्यंत समाधानकारक कामगिरी केली असली, तरी त्यांना मुंबई इंडियन्सला हलक्यात घेऊन चालणार नाही. या सामन्यासाठी लखनऊच्या संभावित प्लेइंग इलेव्हनबद्दल (LSG Predicted XI) विचार करायचा झाल्यास कर्णधार केएल राहुलबरोबर क्विंटन डी कॉक सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो. तसेच अष्टपैलू दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी मधली फळी सांभाळू शकतात, तर कृणाल पंड्या आणि जेसन होल्डर या अष्टपैलू खेळाडूंनाही संधी मिळू शकते. त्याचबरोबर गोलंदाजीत कृष्णप्पा गॉथम, दुश्मंता चमिरा, रवी बिश्नोई आणि अवेश खान यांना संधी मिळू शकते.
आमने-सामने
लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएल २०२२ हंगामात नवा असल्याने त्यांनी यापूर्वी मुंबई इंडियन्सचा सामना केलेला नाही.
खेळपट्टी आणि हवामान
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) सामना होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व दिसू शकते. तसेच या सामन्यावेळी मुंबईतील तापमान २९-३० डिग्री सेल्सियसदरम्यान असू शकते. तसेच हवेत ६० ते ६५ टक्क्यांदरम्यान आद्रता राहू शकते.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) मुंबई विरुद्ध लखनऊ (MI vs LSG) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध लखनऊ सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध लखनऊ सामना १६ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध लखनऊ सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध लखनऊ सामना ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध लखनऊ सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध लखनऊ सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होईल. त्याआधी दुपारी ३.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
मुंबई इंडियन्स संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बासिल थंपी, फॅबियन ऍलन, डॅनियल सॅम्स, टिम डेव्हिड, रिले मेरेडिथ, अनमोलप्रीत सिंग, संजय यादव, रमणदीप सिंग, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल, हृतिक शोकीन, राहुल बुद्धी, अर्शद खान, अर्जुन तेंडुलकर.
लखनऊ सुपर जायंट्स संघ: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृष्णप्पा गॉथम, कृणाल पंड्या, दुश्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई, मनीष पांडे, शाहबाज नदीम , मनन वोहरा, काइल मेयर्स, एविन लुईस, अंकित राजपूत, अँड्र्यू टाय, मोहसीन खान, करण शर्मा, मयंक यादव
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादच्या पठ्ठ्यानं गाजवलं मैदान, अवघ्या २१ चेंडूत झळकावलं हंगामातलं दुसरं वेगवान अर्धशतक
पुन्हा एकदा झाला हैदराबादचा ‘सनराईज’, कोलकाताला ७ विकेट्सने नमवत मिळवला सलग तिसरा विजय