इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या हंगामाला सुरुवात झाली असून रविवारी (२७ मार्च) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात दुसरा सामना होणार आहे. हा आयपीएलचा १५ वा हंगाम असून यंदा १० संघात हा हंगाम खेळवला जाणार आहे. त्यामुळे साखळी फेरीसाठी दोन गट करण्यात आले आहेत. दिल्ली संघ गट अ मध्ये आहे, तर मुंबई गट अ मध्ये आहे.
दोन्ही संघात काही खेळाडूंची अनुपस्थिती
मुंबई संघाला या सामन्यात त्यांच्या धाकड फलंदाजांची कमतरता भासेल. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनातून जात आहे. त्यामुळे तो या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. त्याच्या जागी फॅबियन ऍलनला या सामन्यासाठी संधी दिली जाऊ शकते. दुसरीकडे दिल्ली संघात नव्याने सामील झालेला डेविड वॉर्नरही या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळण्यात व्यस्त आहे.
असे असू शकतात ११ जणांचे संघ
मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला येतील. सूर्यकुमारच्या जागी फॅबियन ऍलन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. मधल्या फळीत मुंबईच्या फलंदाजीचा भार अनुभवी कायरन पोलार्डवर असेल. त्याच्या साथीला तिलक वर्मा, टिम डेविड आणि युवा डेवाल्ड ब्रेविस यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, हे पाहावे लागेल.
गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजी फळीची कमान सांभाळेल. तसेच जयदेव उनाडकटदेखील ब्रेबॉर्न स्टेडियमच्या खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकतो. तसेच मुंबईकडे मयंक मार्कण्डेय आणि मुर्गन अश्विनच्या रूपात प्रभावी फिरकीपटूही उपलब्ध आहेत.
दुसरीकडे दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंत आणि पृथ्वी शॉ सलामीला येऊ शकतात. तर वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज रॉवमन पॉवेल, फॉर्मात असलेला सरफराज खान आणि १९ वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचा कर्णधार यश ढूल मध्यक्रमात चांगले प्रदर्शन करतील. अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल फिनिशरच्या भूमिकेत दिसतील.
फिरकी गोलंदाजी विभागात अक्षर पटेलसह चायनामन गोलंदाज कुलदीप यादव उपलब्ध असतील. तसेच एन्रिच नॉर्किया आणि मुस्तफिजुर रेहमान हे वेगवान गोलंदाजी विभागात असतील. याखेरीज कमलेश नागरकोटीलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
आमने-सामने कामगिरी
आयपीएलच्या १४ हंगामांच्या इतिहासात दिल्ली आणि मुंबई संघ तब्बल ३० वेळा आमने सामने आले आहेत. यातील १४ सामने दिल्लीने जिंकले आहेत. तर मुंबईने १६ सामन्यांमध्ये विजयी पताका झळकावली आहे. दोन्ही संघातील मागील ५ सामन्यांच्या निकालाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यातही मुंबई दिल्लीपेक्षा सरस राहिली आहे. मुंबईने ३ तर दिल्लीने २ सामने जिंकले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ब्रेबॉर्न स्टेडियमवर उभय संघांचा हा पहिलाच आयपीएल सामना असेल.
खेळपट्टी आणि हवामान
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर फलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र खेळ पुढे जात असताना खेळपट्टी रंग बदलते आणि गोलंदाजीसाठी पोषक बनते. परिणामी दुसऱ्या डावात गोलंदाजांना मदत मिळेल. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी निवडण्याला प्राधान्य देईल. रविवारी मुंबईतील हवामान उष्ण असेल. पावसाची शक्यता फार कमी असेल.
आयपीएल २०२२ हंगामातील दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध मुंबई सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध मुंबई सामना २७ मार्च २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध मुंबई सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध मुंबई सामना ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध मुंबई सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध मुंबई सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
मुंबई इंडियन्स-
रोहित शर्मा (कर्णधार), कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बासिल थंपी, एम अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टिळक वर्मा, संजय यादव, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन ऍलन
दिल्ली कॅपिटल्स-
रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एन्रिच नॉर्किया, डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, केएस भरत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी एन्गिडी, टिम सिफर्ट, विकी ओस्तवाल
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2022| पंजाब वि. बेंगलोर सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL2022| मुंबई वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!