आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कमाल दाखवू शकला नव्हता. परंतु सोमवारी (दि. ९ मे) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मागच्या सर्व सामन्यांची कसर त्याने भरून काढली. बुमराहने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्यांदाच एका सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आणि केकेआरला मर्यादित धावसंख्येवर रोखले. बुमराहच्या या कामगिरीनंतर त्याची पत्नी संजना गणेशन खूपच आनंदात दिसली.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने केकेआरविरुद्धच्या या सामन्यात टाकलेल्या चार षटकांमध्ये १० धावा खर्च केल्या आणि पाच विकेट्स घेतल्या. त्याने पहिली विकेट आंद्रे रसलची (९), त्यानंतर दुसरी विकेट नितीश राणा (४३) आणि तिसरी विकेट शेल्डन जॅक्सन (५) याची घेतली. त्यानंतर त्याने पॅट कमिन्स आणि सुनील नारायण यांना त्याने शून्यावर तंबूत धाडले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बुमराहच्या या तुफानी प्रदर्शनानंतर त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganeshan) खूपच आनंदात दिसली. बुमराहने ही कामगिरी केल्यानंतर काहीच मिनिटात तिने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक पोस्ट केली. फोटोत तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे आणि ती हाताची पाच बोटे दाखवत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये देखील तिने हाताच्या पंजाची इमोजी टाकली आहे. तिचा इशारा हा बुमराहच्या पाच विकेट्सच्या हॉलकडे आहे. चाहते संजनाच्या या पोस्टवर ३ लाखांहून अधिक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
https://www.instagram.com/p/CdV-85Oo9mo/?utm_source=ig_web_copy_link
मुंबई इंडियन्सचीही पोस्ट चर्चेत
संजनाच्या या पोस्टनंतर मुंबई इंडियन्सने देखील तिचा हाच फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केला आहे. मुंबईने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “बुमराहने किती विकेट्स घेतल्या संजना?” मुंबई इंडियन्सच्या या मजेदार कॅप्शनवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
Boom नी किती wickets घेतल्या, Sanjana? 😌💥#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvKKR @SanjanaGanesan pic.twitter.com/ZPGy9i6epc
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2022
दरम्यान, आयपीएलमध्ये बुमराहची ही पहिली वेळ आहे, जेव्हा त्याने एका सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत. परंतु मुंबई इंडियन्समध्ये अशी कामगिरी करणारा तो पाचवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, मुनाफ पटेल, अल्झारी जोसेफ यांनी अशीच कामगिरी केली होती. बुमराह आता या यादीत नव्याने सहभागी झाला आहे.
चालू हंगामातील त्याच्या प्रदर्शनावर नजर टाकली, तर मागच्या १० सामन्यांमध्ये तो अवघ्या ५ विके्स घेऊ शकला होता. पण केकेआरविरुद्धच्या या सामन्यानंतर त्याने ११ सामन्यात स्वतःच्या १० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७.४१च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रावळपिंडी एक्सप्रेस’चा विराट कोहलीला सल्ला; म्हणाला, ‘काही सिद्ध करण्याची गरज नाही, फक्त…’
आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या ब्रावोला धोनीचा टोमणा; म्हणाला, ‘…ओल्ड मॅन’