आयपीएल २०२२ च्या ९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २३ धावांनी विजय मिळवला. मुंबईला विजयासाठी राजस्थानने १९४ धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा युवा फलंदाज तिलक वर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या तिलक वर्माने एक षटकार असा, मारला ज्यामुळे मोठा अपघात झाला असता, पण सुदैवाने तो टळला.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा १९ वर्षीय फलंदाजी अष्टपैलू तिलक वर्मा (Tilak Varma) या सामन्यात स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ३३ चेंडू खेळले आणि यामध्ये ६१ धावा फटकावल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि ५ षटकार निघाले. त्याने एक षटकार असा मारला, ज्यामुळे सीमारेषेबाहेर स्वतःचे काम करत असलेला कॅमेरामॅन दुखापतग्रस्त झाला असता. रियान परागच्या षटकात तिलकने हा षटकार मारला होता आणि तो थेट कॅमेरामॅनच्या डोक्यात जाऊन लागला.
आश्चर्यचकीत करणारी गोष्ट ही आहे की, चेंडू थेट कॅमेरामॅनच्या डोक्यात लागला असूनही त्याला कसलीही दुखापत झाली नाही. त्या व्यक्तीला दुखापत झाली नाही, ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु या घटनेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. सीमारेषेजवळ त्यावेळी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट क्षेत्ररक्षण करत होता. कॅमेरामॅनच्या मदतीसाठी बोल्ट कुणालातरी बोलावतो, पण तितक्यात कॅमेरामॅन हात वर करून म्हणतो, तो एकदम ठीक आहे. चेंडू लागल्यानंतर कॅमेरामॅनची रिएक्शन पाहून प्रत्येक जण हैराण आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1510244878298480647?s=20&t=JMeBLYH_mTI9YOAwkgfJ2w
https://twitter.com/JalaluddinSark8/status/1510242765812092928?s=20&t=Ks1MGU85VEi4EmmslLji-g
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील करत आहेत. या सामन्याचा विचार केला, तर तिलक वर्मा बाद झाल्यानंतर मुंबई संघाला एकप्रकारे गळतीच लागली. शेवटी मुंबईला विजयासाठी २३ धावा कमी पडल्या आणि राजस्थानने सामना नावावर केला. आयपीएल २०२२ हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या पहिल्या विजयासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
मुंबईचे चेन्नईच्या पावलावर पाऊल, सलग दोन्ही सामने गमावले; पुढील सामन्यात ‘यांना’ मिळणार डच्चू
मुंबईने सपाटून मार खाल्ला, पण ईशान एकटाच लढला; टी२०तील तीन हजारी मनसबदार बनला
हेटमायरने पोलार्डला दिला चांगलाच चोप, एकाच षटकार २६ धावा कुटत रोहितलाही आणलं रडकुंडीस






