---Advertisement---

रोहितच्या भन्नाट षटकारानंतर पत्नी रितीकाची खुलली कळी, सारानेही टाळ्या वाजवत केलं कौतुक

Rohit-Sharma-Six-Sara-Ritika-reaction
---Advertisement---

बुधवारी (१७ मे) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ३ धावांनी मुंबई इंडियन्सला मात दिली. रोहित शर्माने मुंबईच्या डावाची सुरुवात चांगली केली, पण संघाला हैदराबादने उभे केलेले मोठे लक्ष्य गाठता आले नाही. रोहितने मारलेल्या एका जबरदस्त षटकारानंतर त्याची पत्नी रितिका सजदेह खूपच आनंदात दिसली. सोबतच सारा तेंडुलकर देखील या शॉटनंतर आनंद व्यक्त करताना दिसली.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएल २०२२ मध्ये खूपच निराशाजनक प्रदर्शन करताना दिसला आहे. त्याने चालू हंगामात अद्याप एकही अर्धशतक केले नाहीये. अशात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने जे प्रदर्शन केले, ते तुलनेने चांगले होते. फक्त दोन धावा कमी पडल्यामुळे त्याचे अर्धशतक पूर्ण झाले नाही. ३६ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने त्याने ४८ धावा केल्या.

मोठ्या काळानंतर चाहत्यांना रोहितचा जुना फॉर्म पाहायला मिळाला. मुंबईच्या डावातील दुसऱ्या षटकात त्याने एक मोठा षटकार मारला. हा षटकार पाहून त्याची पत्नी रितीका सजदेह (Ritika Sajdeh) आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) उत्साहीत झाल्या होत्या. हा षटकार त्याने भुवनेश्वर कुमारच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मारला. असे असले तरी, भुवनेश्वर नंतर शेवटच्या षटकांमध्ये मुंबईसाठी सर्वात महागात पडला. रितिका आणि साराच्या रिऍक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/AkshatOM10/status/1526611419466043393?s=20&t=tUmY5YbG-Y-KskPXcLZkEA

https://twitter.com/AbdullahNeaz/status/1526599621719404545?s=20&t=dG842GI5jRYpu9oZ3CTvpA

 

https://twitter.com/Rahilsa61575873/status/1526627564592041984?s=20&t=KU2OagRscWAN0q-_776Lew

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या अपेक्षा तोपर्यंत जिवंत होत्या, जोपर्यंत टिम डेविड खेळपट्टीवर होता. डेविडने अवघ्या १८ चेंडूत ४६ धावा केल्या आणि तो संघाला विजय देखील मिळवून देऊ शकत होता. परंतु त्याने विकेट गमावल्यानंतर संघाला लक्ष्य गाठता आले नाही. भुवनेश्वर कुमारने १९ व्या षटकात एक महत्वाची विकेट घेतली आणि एकही धाव खर्च केली नाही. त्यावेळी मुंबईला १२ चेंडूत १९ धावांची आवश्यकता होती.

सामन्याच्या सुरुवातीला मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने ६ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला ७ विकेट्सच्या नुकसानावर १९० धावा करता आल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

नो बॉल, वाईड, पुन्हा नो बॉल; आधी व्हिलन बनलेला उमरान मलिक शेवटी ‘असा’ ठरला हिरो

मुंबईचा दहावा पराभव, पण ‘या’ खेळाडूने स्वत:ला केले सिद्ध; दाखवला चमकदार अष्टपैलू खेळ

एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज: तीन मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---