इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये सध्या एमएस धोनी सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याने कर्णधाराच्या रूपात सर्वात जास्त आयपीएल सामने जिंकले आहेत. मागच्या हंगामात त्याच्याच नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने त्यांची चौथी ट्रॉफी जिंकली होती. धोनी अजूनही सीएकेचे प्रतिनिधित्व करत आहे आणि भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने त्याला एक सल्ला दिला आहे. पटेलच्या मते धोनीने सलामीसाठी मैदानात उतरून संघाला संकटातून बाहेर काढले पाहिजे.
चालू आयपीएल हंगामात सीएसकेचे सलामीवीर अपयशी ठरल्यामुळे संघाला त्याची किंमत मोजावी लागील आहे. अशात पार्थिव पटेल (Parthiv Patel) याच्या मते एसएस धोनी (MS Dhoni) सलामीसाठी येऊन संघाला अडचणीतून बाहेर काढू शकतो. तो म्हणाला की, “धोनी तो खेळाडू आहे, ज्याने सीएसकेला अनेक वर्षांपासून मजबूती दिली आहे. त्याने सलामीवीर फलंदाजाच्या रूपात कारकिर्दीची सुरुवात केली होती. अशात मग तो कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असे का करू शकत नाही? तो आता ७व्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे आणि कसाबसा १० ते १५ चेंडू खेळत आहे. तर मग ३- ४ क्रमांकावर किंवा सलामीसाठी का येऊ नये. जर त्याने १४- १५ षटकांपर्यंत फलंदाजी केली, तर काहीही होऊ शकते.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
सध्या युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि अनुभवी रॉबिन उथप्पा सीएसकेसाठी डावाची सुरुवात करत आहेत आणि दोघांनाही चांगले प्रदर्शन आलेले नाहीय. ऋतुराजने हंगामातील सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये अनुक्रमे ०, १, १ आणि १६ धावा केल्या आहेत, तर दुसरीकडे रॉबिन उथप्पाने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध जरी अर्धशतक केले असले, तरी त्याला इतर तीन सामन्यात अपेक्षित खेळ दाखवता आलेला नाहीये. त्याने ४ सामन्यात २७च्या सरासरीने १०६ धावा केल्या आहेत.
सलामीवीरांच्या अपयशाचा किंमत संघाला नक्कीच मोजावी लागली आहे. सीएसकेला चालू हंगामात खेळलेल्या सुरुवातीच्या चार सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आलेला नाहीये. संघाला अजून हंगामातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. एमएस धोनीचे हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर केकेआरविरुद्ध त्याने ३८ चेंडूत ५० धावा ठोकल्या होत्या. तसेच, लखनऊविरुद्ध ६ चेंडूत १६ धावांची दमदार खेळीही केली होती. अशातच आता पार्थिव पटेलने केलेले वक्तव्य चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबी वि. सीएसके सामन्यापूर्वी मैदानात आली ‘फॅमिलीवाली’ फिलिंग; धोनी, विराट आणि फाफची गळाभेट
‘श्रीलंकेच्या सर्व खेळाडूंनी आयपीएलसोडून मायदेशी परत यावे’, अर्जुन रणतुंगा यांची साद
IPL 2022 | मुंबई, पुणे नव्हे तर ‘या’ ठिकाणी रंगणार प्लेऑफ सामने, फायनल अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता