इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले. दूसऱ्या सामन्यात संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. आरसीबी संघाच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध कोलकाताचे फलंदाज अपयशी ठरले. कोलकाता संघ १२८ धावांवर सर्वबाद झाला. आता संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोलकाताचा गोलंदाज पॅट कमिन्स भारतात दाखल झाला आहे आणि सध्या तो क्वारंटाइन झाला आहे.
तो केकेआर संघासोबत चौथा सामना खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. केकेआरच्या(KKR) अधिकृत अकाऊंटवरुन याबद्दल माहिती देण्यात आली आहे. फ्रॅंचायझीने त्याचा फोटो पोस्ट करत लिहले की, ‘पॅट इज बॅक’. केकेआरने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात कमिंसला ७. २५ कोटींना विकत घेतले आहे.
He's back! Pat is back! 😍@patcummins30 #KKRHaiTaiyaar #IPL2022 pic.twitter.com/ZS2ytwci7I
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
पॅट कमिन्स पाकिस्तान दौऱ्यावर होता, जेथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ही मालिका १-० ने जिंकली. दोन दशकांनंतर पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका जिंकली आहे. या विजयाचा हिरो ठरला पॅट कमिन्स, ज्याने तिसऱ्या कसोटीत ८ विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला. सध्या ऑस्ट्रेलिया संघ ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे, ज्यापैकी एक सामना पाकिस्तान तर एक ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केला आहे. कमिन्स या मालिकेचा भाग नाही त्यामुळे तो फ्रॅंचाय़झीशी जोडला गेला आहे.
कमिन्स एकटाच नाही तर ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये उशीरा सहभागी होणार आहेत. त्याच्याशिवाय मार्कस स्टाॅयनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, जोश हेजलवूड, डविड वाॅर्नर हे खेळाडू या लीगसाठी उपलब्ध नाहीत. कमिन्स सारखेच इतर खेळाडू सुद्धा लवकरात लवकर फ्रॅंचायझीत समाविष्ट होतील. या खेळाडूंना भारतात येवून क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. आरसीबीचा मॅक्सवेल सुद्धा भारतात फ्रॅंचायझीसोबत जोडला गेला आहे. सर्व खेळाडू आल्यानंतर रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मुंबईत नायगरा वॉटरफॉलप्रमाणे दव पडतंय’, सलग दुसऱ्या पराभवानंतर सीएसकेच्या प्रशिक्षकांचे मोठे भाष्य
‘मला हे बिलकुल आवडलेलं नाही’, हातातला सामना गमावल्यानंतर ‘जडेजाने’ टोचले धोनीचे कान
‘हम तो दुबे हैं सनम, तुम को भी ले डूबे’, सीएसकेच्या दुसऱ्या पराभवानंतर पडतोय मीम्सचा पाऊस