आयपीएलच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जसोबत झाला. पंजाबसाठी शिखर धवन आणि भानुका राजपक्षाने अप्रतिम प्रदर्शन केले. तर दुसरीकडे सीएसकेचा अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्रावोने दोन चेंडू खेळपट्टीच्या बाहेर टाकले. पंचांनी या दोन्ही चेंडूंवर थेट नो बॉल करार दिला.
आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामात ही पहिलीच वेळ होती, जेव्हा एखाद्या गोलंदाजाने खेळपट्टीच्या बाहेर चेंडू फेकला आहे. ब्रावोने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ही चूक एकदा नाही, तर दोन वेळा केली. ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) याने खेळपट्टीबाहेर टाकलेले हे दोन्ही चेंडू शिखर धवन स्ट्राइकवर असताना टाकले. या दोन्ही नो बॉलमुळे धवनला धावा करण्यासाठी मदत मिळाली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिखर धवन (Shikhar Dhawan) स्ट्राइकवर असताना डावाच्या १६ व्या षटकात ब्रावोने पहिल्यांदा ही चूक केली. शिखर धवन ऑफ स्टंपच्या बाहेर निघून फलंदाजी करू इच्छित होता. धवनला आधीच चाहूल लागली होती की, ब्रावो ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याची शक्यता आहे. ब्रोवने देखील तसेच केले, पण चेंडू थेट खेळपट्टीच्या बाहेर पडला आणि पंचांनी त्याला नो बॉल करार दिला. त्यानंतर पुढचा चेंडूवर फ्री हिट मिळाली. या फ्री हिटच्या चेंडूर धवनने चौकार ठोकला आणि ब्रावोला अडचणीत टाकले.
त्यानंतर पंजाब किंग्जच्या डावाच्या १८ व्या षटकात ब्रावो पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला होता. चेंडू मारला जाऊ नये म्हणून ब्रावोने ऑफ साइडला वाइड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी त्याच्याकडून पुन्हा एकदा चूक झाली आणि चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला. पंचांनी पुन्हा एकदा या चेंडूला नो बॉल करार दिला. परंतु यावेळी फ्री हिटमध्ये धवनला फक्त एक धाव मिळाली.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ४ विकेट्सच्या नुकसानावर १८७ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर धवनने ५९ चेंडूत केकेल्या ८८ धावांचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. तसेच भानुका राजपक्षाने ३२ चेंडूत ४२ धावा केल्या आणि धवनसोबत ११० धावांची भागीदारी पार पाडली. चालू हंगामात पंजाब किंग्जसाठी ही पहिली १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी ठरली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भर मैदानात कृणालचं पोलार्डवरील प्रेम गेलं उत्तू, घेतलं मुंबईकराच्या डोक्याचं चुंबन; पाहा Video
पंधरा कोटी पाण्यात घालणाऱ्या इशानविरुद्ध मुंबई इंडियन्स घेणार ‘ऍक्शन’! प्रशिक्षकांकडून संकेत
सलग ८ पराभवांनंतर रोहित शर्माचे तुटले हृदय, केले भावूक ट्वीट; चाहत्यांचेही मानले आभार