पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२२चा १६वा सामना खेळला गेला. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आल्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अगरवाल पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. या खराब प्रदर्शनानंतर मयंक पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.
केएल राहुलने (KL Rahul) पंजाब किंग्जची साथ सोडल्यानंतर मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले गेले. कर्णधाराच्या रूपात मयंक समाधानकारक प्रदर्शन करत आहे. मात्र, जेव्हापासून त्याने नेतृत्वाची जबाबदारी घेतली आहे, तेव्हापासून फलंदाजाच्या रूपात तो अपयशी ठरत आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध मयंक पुन्हा एकहा अपेक्षित खेळी करू शकला नाही. त्याने ९ चेंडूत अवघ्या एका चौकाराच्या मदतीने ५ धावा केल्या आणि विकेट गमावली.
अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर मयंकने विकेट गमावली. हार्दिकने ही महत्वाची विकेट घेताच ट्विटरवर मयंक अगरवाल ट्रेंड करू लागला. चाहते त्याच्या निराशाजनक खेळीनंतर ट्विटरवर व्यक्त होत टीका करत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात मजेशीर मिम्सही शेअर केले जात आहेत. एकाने तर ट्वीट करत म्हणले आहे की, “मयंकने आता मिठाईच्या दुकानात बसले पाहिजे. फलंदाजी त्याला जमत नाही.”
Ye Mayank agarwal ko vapas apni halwayi ki dukaan par baith jaana chahiye abb batting iske bas ki nahi. #GTvsPBKS
— Hunटरर ♂ (@nickhunterr) April 8, 2022
Mayank Agarwal ko sharminda hona chahiye.
— Akash (@Akashkumarjha14) April 8, 2022
https://twitter.com/midhun_vignesh/status/1512432683036848128?s=20&t=m6gLFNcyl90PxuH56UyYRA
Mayank Agarwal Bhai 😶#GTvsPBKS #ipl2022 pic.twitter.com/MFxGUeZMsf
— Tanay (@tanay_chawda1) April 8, 2022
https://twitter.com/Myan_zalik/status/1512432955976781830?s=20&t=cZ9V33a2db_tf9729TgfuQ
Mayank Agarwal so far in IPL🙅♂️#ACKOForTheFans#ACKO #PBKSvsGT@ACKOIndia 🔥 pic.twitter.com/FrlSuEqN7U
— Krishna Kant Jaju (@K_kantjaju12) April 8, 2022
सामन्याचा विचार केला, तर हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पंजाब किंग्जने चांगली फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने ९ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या. लियाम लिविंगस्टोनने पंजाबसाठी मध्यक्रमात सर्वात जास्त ६४ धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या ७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
आयपीएल २०२२मधील मयंक अगरवालच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर केकेआरविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात १, तर सीएसकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ४ धावा करून तो बाद झाला होता. आता चौथ्या सामन्यात देखील तो पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिवसे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘या’ तिघांकडून होत्या खूप अपेक्षा, पण आयपीएल २०२२च्या सुरुवातीलाच ठरलेत सपशेल फ्लॉप
चहलसोबत वाईट कृत्य करणाऱ्या खेळाडूवर भडकला सेहवाग; म्हणाला, ‘दारूच्या नशेत त्याच्यासोबत…’
पंजाब किंग्जच्या प्लेइंग ११वरून भारताच्या माजी दिग्गजाने घेतली फिरकी, शेअर केला फिल्मी व्हिडिओ