आयपीएल २०२२ च्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मात दिली. आरसीबीची या हंगामाची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या केलेल्या आरसीबीसाठी विजय सोपा वाटत होता, पण पंजाबच्या फलंदाजांनी डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या धुलाईमुळे सामना जिंकला. या विजयानंतर पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा एक महत्वाचा विक्रम मोडीत काढला.
पंजाब किग्जने मोडला सीएसकेचा विक्रम
पंजाब किंग्जला विजयासाठी २०६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी एक षटक शिल्लक ठेवून गाठले. आयपीएलमध्ये ही चौथी वेळ आहे, जेव्हा पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाने २०० पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. यापूर्वी सर्वाधिकवेळा २०० धावांचा यशस्वी पाठलाग करण्याच्या यादीत चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्जच्या नावावर संयुक्तरित्या होता. सीएसकेने २०० पेक्षा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना तीन वेळा विजय मिळवला आहे. आता पंजाब किंग्जने सीएसकेचा विक्रम मोडला आहे.
शिखर धवनने महत्वाच्या यादीत डेविड वॉर्नरला टाकेल मागे
पंजाबच्या विजयात त्यांच्या फलंदाजांची भूमिका महत्वाची होती. संघातली प्रत्येक फलंदाजने योगदान दिले. सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhavan) आणि मयंक अगरवालने ७१ धावांची भागीदारी केली. धवनने एक षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने वैयक्तिक ४३ धावा केल्या. सामन्यात पंजाबने विजय तर मिळवला, पण धनवने मोठा विक्रमही केला. धवन आता आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू बनला आहे आणि डेविड वॉर्नरला त्याने मागे टाकले आहे.
आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज
विराट कोहली – २९०२ धावा
रॉबिन उथप्पा – २७८७ धावा
शिखर धवन – २५८२ धावा
डेविड वार्नर – २५६९ धावा
गौतम गंभीर – २४६० धावा
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना आरसीबने २ विकेट्सच्या नुकसानावर २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने ५ विकेट्सच्या नुकसानावर २०८ धावा केल्या. आरसीबीसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ८८ धावा केल्या. तसेच माजी कर्णधार विराट कोहली (४१) आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (३२) यांचे योगदानही महत्वाचे ठरले.
दुसरीकडे पंजाब किंग्जसाठी त्यांच्या प्रत्येक फलंदाजने महत्वाची खेळी केली, पण ओडियन स्मिथने ८ चेंडूत केकेल्या २५ धावांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. स्मिथच्या या खेळीच्या जोरावर पंजाबने सामना जिंकवला आणि स्वतः सामनावीर ठरला.