इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) ७ विकेट्ने पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर शुकवारी (२७ मे) झालेल्या या सामन्याच्या विजयाने राजस्थानने १४ वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
या पराभवाने निराश न होता बेंगलारचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने संघसहकारी, भारतामध्ये क्रिकेटबद्दल असलेले प्रेम, भारतीय संस्कृती आणि बेंगलोर संघासाठी चाहत्यांनी दिलेला पाठिंबा याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
सामन्यानंतर फाफ म्हणाला, “पहिले ३ ते ४ षटके ही कसोटी क्रिकेटसारखी वाटली. कारण या खेळपट्टीवर नवीन चेंडू उसळी घेत होता. त्याने सुरूवातीला फलंदाजी करण्यास थोडे अवघड गेले. नंतर मात्र चांगला खेळ केला. आम्ही १८० पेक्षा अधिक धावा करण्याचे लक्ष्य ठेवले होते.”
“बेंगलोरसोबत मी पहिलाच आयपीएल हंगाम खेळत आहे. यादरम्यान संघाने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला याबद्दल मला अभिमान आहे. तसेच बेंगलोर संघ जेथे जातो तेथे संघांचे चाहते ‘आरसीबी’, ‘आरसीबी’ असा नारा देतात. त्यांच्या या समर्थनाबद्दल मी चाहत्यांचे आभार मानतो”, असेही फाफने पुढे म्हटले आहे.
हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिक या दोघांनी या आयपीएल हंगामात आरसीबीच्या प्रवासात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. “त्या दोघांनी अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये उत्तम खेळ केला. त्यांना संधी ह्या मिळायलाच हव्या. म्हणून त्यांची भारताच्या संघात निवड होणे हे योग्यच आहे”, असे म्हणत फाफने कार्तिक आणि पटलचे कौतुक केले आहे.
“आम्ही जेव्हा सामना खेळून हॉटेलवर पोहोचतो तेव्हा हॉटेलचे स्टाफ हे रात्री उशिरापर्यत काम करताना दिसतात. तसेच ते सकाळी ७ वाजेपर्यत आम्हाला वेळेवर नाश्ता देत असत. त्यांच्या या चांगल्या वागणुकीचे आणि कामा प्रतीची निष्ठेचे मी आभार मानतो. असे भारतामध्ये सगळीकडेच असेल. हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे”, असे फाफने भारतीय संस्कृतीबद्दल चांगले बोल बोलले आहे.
दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरवत राजस्थानच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. रजत पाटीदार वगळता बेंगलोरचे कोणतेच फलंदाज खेळपट्टीवर अधिक काळ तग धरू शकले नाही. त्याने ४२ चेंडूत ५८ धावा केल्या. बेंगलोरने २० षटकात आठ विकेट्स गमावत १५७ धावा केल्या.
सामन्यात विजय मिळवण्याच्या जिद्दीने उतरलेल्या राजस्थानने फलंदाजीस उत्तम सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जायसवालने पहिल्याच षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारत सुंदर फटकेबाजी केली. तो बाद झाल्यावर जोस बटलरने तडकाफडकी फलंदाजी सुरूच ठेवत २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
या सामन्यात बटलरने ५४ चेंडूत नाबाद १०६ धावा करत या आयपीएल हंगामातील त्याचे चौथे शतक साजरे केले. हा सामना राजस्थानने ११ चेंडू राखून आणि ७ विकेट्सने जिंकला.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जल्लोष तर होणारच! १४ वर्षांनी आयपीएल फायनलला पोहचलेल्या राजस्थानचे ‘रॉयल’ सेलिब्रेशन
IPL प्लेऑफमध्ये वॉर्नरला पछाडत बटलरने दाखवला ‘जोश’! पाटीदारचाही विक्रमाच्या यादीत समावेश