---Advertisement---

ऑरेंज कॅप विजेत्या बटलरने नेट्समध्ये केली चहलला गोलंदाजी; दोघांमधील मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल

Yuzvendra-Chahal-And-Jos-Buttler
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये संघातील खेळाडू नेट्समध्ये सराव करत असताना अनेक मजेशीर किस्से घडतात. यामुळे ते चर्चेचा विषयही ठरतात. असेच काहीसे पुन्हा झाले आहे. राजस्थान रॉयल्स संघातील ऑरेंज कॅपचा मानकरी जोस बटलर आणि फिरकीपटू युझवेंद्र चहल यांनी नुकतेच नेट्सदरम्यान चांगलीच मजा-मस्ती केली. चहलने फलंदाजी केली, तर बटलरने फिरकी गोलंदाजी केली. दोघांमधील हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सध्याचा हंगाम युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि जोस बटलर (Jos Buttler) दोघांसाठी चांगलाच राहिला आहे. चहल आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवण्याच्या बाबतीत संयुक्तरीत्या अव्वलस्थानी आहे, तर बटलरकडे ऑरेंज कॅप आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)  फ्रँचायझीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून याची झलक दाखवली आहे. चहल आणि बटलर यांच्यात नेटमध्ये खूप धमाल-मस्ती झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

राजस्थानने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “असं ऐकलंय की, युझी अजूनही ‘चार धावा’ असे ओरडत आहे.”

चहलनेही प्रतिक्रिया देत लिहिले की, “४४४४४४६.”

संजू सॅमसनला मिळाला मोलाचा सल्ला

माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राने नुकताच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, सॅमसनला काही वेळ क्रीजवर घालवण्याची गरज आहे, जेणेकरून परिस्थिती समजून घेतल्यानंतर तो आपले शॉट्स मुक्तपणे खेळू शकेल.

चोप्रा म्हणाला की, “राजस्थान रॉयल्सने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये सुरुवातीचे संयोजन बदलले आणि यशस्वी जयसवालने चांगली फलंदाजी केल्याने हे शानदार झाले. त्याने चांगली खेळी खेळली. मात्र, मी संजू सॅमसनला सांगू इच्छितो की, क्रीजवर थोडा वेळ घालव आणि जास्त वेळ फलंदाजी कर.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

राजस्थान संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाचा प्रयत्न हा प्लेऑफमध्ये जागा पक्की करण्याचा असेल. राजस्थानला आणखी २ सामने खेळायचे आहेत. त्यातील दोन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवल्यानंतर ते प्लेऑफसाठी क्वालिफाय होतील.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---