इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या मैदानात सोमवारी (११ एप्रिल) गुजरात टायटन्सला सनरायझर्स हैदराबादकडून हंगामातील त्यांचा पहिला पराभव पत्करावा लागला. हैदराबादने हा सामना ८ विकेट्सने जिंकला. अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकी गोलंदाज राशिद खान मागच्या हंगामापर्यंत हैदराबादचा महत्वाचा खेळाडू होता, पण यावर्षी तो गुजरात टायटन्सचा उपकर्णधार आहे. राशिदचे चालू हंगामातील प्रदर्शन त्याच्या इच्छेप्रमाणे राहिले आहे. असे असेल, तरी त्याला विश्वास आहे की, पुढच्या सामन्यांमध्ये त्याचे प्रदर्शन सुधारेल.
चालू आयपीएल हंगामात खेळळेल्या ४ सामन्यांमध्ये राशिद खान (Rashid Khan) ६ विकेट्स नावावर करू शकला आहे. त्याच्या मते चालू हंगामात विरोधी खेळाडू त्याच्याविरुद्ध सावध भूमिका घेत आहेत. माध्यमांशी चर्चा करताना राशिद म्हणाला की, “स्पर्धेत आतापर्यंतच्या माझ्या गोलंदाजीवर मी खुश आहे. मी परिणामांवर अधिक लक्ष देत नाही. मी कशी गोलंदाजी करत आहे, त्यावर हे आधारीत असते. सध्या मी खूप चांगली गोलंदाजी करत आहे. विरोधी संघ माझ्या विरोधात त्या पद्धतीचा धोका पत्करत नाहीये, ज्यामुळे तुम्हाला अधिक विकेट्स मिळतात.” हैदराबादविरुद्धच्या सामन्यात १५ ते २० धावा कमी पडल्यामुळे पराभव मिळाल्या असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
त्याच्या जुना संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राशिदने टाकलेल्या ४ षटकांमध्ये २८ धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली. त्याच्या नावावर सध्या ९९ आयपीएल विकेट्स आहेत. तो पुढे बोलताना म्हणाला की, “आयपीएलमध्ये नेहमीच सुरुवात हळुवारपणे झाली आहे. पहिल्या ४-५ सामन्यात त्याला १२-१३ नाही, पण ५ किंवा ६ विकेट्स मिळत आल्या आहेत. परंतु या आकड्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल आणि एक वेळ येईल जेव्हा मी शानदार स्पेल करेल.”
Another one bites the dust! ☝️@rashidkhan_19 gets Shahrukh Khan out LBW! 👏 👏#PBKS 7 down.
Follow the match ▶️ https://t.co/GJN6Rf8GKJ#TATAIPL | #PBKSvGT | @gujarat_titans pic.twitter.com/MzGzmQbmso
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2022
राशिदचा आयपीएलमधील प्रवास तसा पाहिला, तर अविश्वसनीय आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, “अफगाणिस्तानमधून येऊन आयपीएल पदार्पण करणे आणि सर्व सामने खेळणे, ही गोष्ट खास आहे. पाच वर्षांपूर्वी मी आयपीएल खेळण्याचा विचारही केला नव्हता. १०० विकेट्सच्या जवळ पोहोचणे, गुजरातचा उपकर्णधार बनणे, ही मोठी गोष्ट आहे.”
राशिद खान अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे आणि आयपीएलमध्ये त्याचा अनुभव मोठा आहे. त्याने आतापर्यंत ८० आयपीएल सामने खेळले आहेत आणि यामध्ये ९९ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हरभजनचा ‘माही’वर घणाघात; “एकट्या धोनीने वर्ल्डकप जिंकवला, मग बाकीचे काय …. प्यायला गेले होते का”
टीम बॅन झाली नसती तर आज यादीत टॉपला असती; IPL संघ म्हणून सीएसकेने नोंदवला खास विक्रम
‘धोनी ओपनिंग करून संघाला संकटातून काढू शकतो बाहेर’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे विधान