रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी), आयपीएलमध्ये सातत्याने चांगला प्रदर्शन करणारा हा संघ त्यांच्या पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात नवा कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्त्वाखाली आरसीबी संघ आणखीनच मजबूत दिसत आहे. पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाने हंगामाची सुरुवात करणाऱ्या आरसीबीने पुढे दमदार पुनमरागमन करत मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स अशा संघांना पराभूत केले आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे म्हणणे आहे की, फाफच्या नेतृत्त्वाखाली आरसीबी संघ पंधराव्या हंगामात प्लेऑफमध्ये जागा मिळवेल.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, “मला असे वाटते, या हंगामात आपल्याला एक नवा विजेता (New IPL Champion) पाहायला मिळू शकतो. आरसीबी (Royal Challengers Bangalore) या आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करत आहे आणि निश्चितपणे ते यावेळी प्लेऑफमध्ये जागा बनवतील. जस-जसा हंगाम पुढे जात आहे तसतसा आरसीबीचा संघ फॉर्ममध्ये येत आहे. ते सध्या चांगल्या स्थितीत दिसत आहेत. ते प्रत्येक सामन्यासहित आणखी मजबूत बनत आहेत. आरसीबीला विजेता बनवण्यात नवा कर्णधार फाफ(Faf Du Plesis), माजी कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल महत्त्वाची भूमिका बजावतील.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
“विराट चांगले खेळत आहे. मॅक्सवेलही संघासोबत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की, तो विरोधी संघासाठी किती घातक ठरू शकतो. त्यातही तो फिरकीपटूंचा घाम काढण्यात पटाईत आहे. हंगाम पुढे जात असताना तो आरसीबीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. अजून फाफ संघाचे नेतृत्त्व करत आहे, जो त्यांच्यासाठी एक बोनस पाँईट असेल,” असे शास्त्रींनी (Ravi Shastri Prediction) पुढे म्हटले.
आरसीबीने आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. ते आतापर्यंत ३ वेळा आयपीएलचे उपविजेते राहिले आहेत. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये अंतिम सामन्यात पोहोचूनही आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. परंतु या हंगामात हा संघ ६ पैकी ४ सामने जिंकत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशात शास्त्री यांच्या अंदाजानुसार आरसीबी प्लेऑफमध्ये धडक मारत ट्रॉफी उंचावण्याची अद्भुत कामगिरी करून दाखवेल की नाही? हे पाहावे लागेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सामना राहिला बाजूला, कुलदीप आणि मॅक्सवेलचं आले आमने सामने; पाहायला मिळाली काट्याची टक्कर
रोहितने चक्क खोटा कॅच घेत केलंय सेलिब्रेशन, चाहत्यांचाही उडाला गोंधळ; Video व्हायरल