---Advertisement---

याला काय अर्थय! एलिमिनेटर सामन्यात आरसीबीच्या कॅप्टनचा फ्लॉप शो, धोनी- रोहितनंतर फाफची नकोशी कामगिरी

On: बुधवार, मे 25, 2022 11:14 PM
Faf-Du-Plessis
---Advertisement---

बुधवारी (२५ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना- सामना झाला. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे होते. जो संघ पराभूत होणार त्या स्पर्धेतील प्रवास देखील संपणार होता. आरसीबीने सामन्यात गमावल्यामुळे प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्याच षटकात त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने विकेट गमावली. डू प्लेसिस आयपीएलच्या प्लेऑफमध्ये गोल्डन डकवर बाद होणारा तिसरा कर्णधार ठरला आहे.

आरसीबीला डावाच्या पहिल्याच षटकात कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plasis) याच्या रूपात झटका मिळाला. मोहसिन खानने टाकलेल्या पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर डू प्लेसिस यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातून झेलबाद झाला. डू प्लेसिसने खेळलेल्या पहिल्या चेंडूवर एकही धाव न करता (गोल्डन डक) विकेट मगावली आणि एका नकोशा विक्रमाची नोंद स्वतःच्या नावापुढे केली.

आयपीएल प्लेऑफ फेरी ही प्रत्येक संघासाठी महत्वाची असते. या टप्प्यावर आल्यानंतर संघातील प्रत्येक खेळाडू काळजीपूर्व खेळत असतो, पण त्यातही काहीजण असे असतात, जे उत्साहामध्ये स्वस्तात बाद होतात. डू प्लेसिस देखील त्यांच्यातील एक ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात असे दोन कर्णधार होते, ज्यांनी प्लेऑफ फेरीत पहिल्या पाच क्रमांकावर फलंदाजी करताना गोल्डन डकवर विकेट गमावली होती. आता या कर्णधारांच्या यादीत डू प्लेसिसच्या रूपात तिसरा सदस्य सहभागी झाला आहे.

आयपीएल प्लेऑफमध्ये गोल्डन डकवर बाद होणार कर्णधार (पहिल्या पाच क्रमांकावर फलंदाजी करताना)
एमएस धोनी (आयपीएल २०१५)
रोहित शर्मा (आयपीएल २०२०)
फाफ डू प्लेसिस (आयपीएल २०२२)

दरम्यान, उभय संघात खेळल्या गेलेल्या या एलिमिनेटर सामन्याचा विचार केला, तर लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा युवा खेळाडू रजत पाटीदारने अवघ्या ४९ चेंडूत धमाकेदार शतक पूर्ण केले. तसचे अनुभवी दिनेश कार्तिकने देखील शेवटच्या षटकांमध्ये ताबडतोड ३७ धावांचे योगदान दिले. आरसीबने निर्धारित २० षटकांमध्ये ४ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. आरसीबीसाठी गोलंदाज मोहसिन खान, कृणाल पंड्या, आवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘माझं नाव नेहमी विकलं जातं’, गुजरात टायटन्सला फायलनमध्ये पोहोचवल्यानंतर असे का म्हणाला हार्दिक पंड्या?

अर्रर्र! दुसऱ्या क्वालिफायरआधीच राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, धाकड अष्टपैलूची स्पर्धेतून माघार

‘आम्ही अजून आयपीएलमधून बाहेर गेलो नाही, आम्हाला…’, टेबल टॉपरविरुद्ध पराभूत झाल्यानंतर बटलरचं वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---