आयपीएल २०२२ चा शुभारंभ २६ मार्चपासून होत आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील साखळी सामने यावेळी महाराष्ट्रात पार पडणार आहे, तर प्लेऑफचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाहीत. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी काही संघांनी मोठे बदल केले आहेत. त्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचाही समावेश आहे. विराट कोहलीने बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता संघाला नवीन कर्णधार मिळाला आहे. बेंगलोर संघाने शनिवारी (१२ मार्च) RCB Unbox कार्यक्रमादरम्यान फाफ डू प्लेसिसला संघाचा नवीन कर्णधार नेमले आहे. याचदरम्यान, विराटने कर्णधारपद का सोडले याबद्दल संघाचे संचालक आणि प्रशिक्षक माईक हेसन यांनी कारण सांगितले आहे.
हेसन म्हणाले की, विराटला आपल्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे. तसेच, फ्रँचायझीला आपले पहिले किताब जिंकून देण्यात मदत करायची आहे. हेसनन यांनी विराटच्या कर्णधारपद सोडण्यामागील कारणाबद्दलही चर्चा केली. ते म्हणाले की, “त्याला एक ब्रेक घ्यायचा होता आणि संघ व्यवस्थापनाने स्टार फलंदाजाच्या या निर्णयाचा स्वीकार केला.”
हेसन या कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, “विराटने एक कर्णधार म्हणून फ्रँचायझीला सर्वकाही दिले आहे. त्याने आपले हृदय आणि आत्मा दिला आहे. हे स्पष्ट आहे की, जेव्हा तुम्ही एका भूमिकेतून राजीनामा देता, तेव्हा तुम्हाला एक ब्रेक घ्यायचा असतो. त्याला एक वरिष्ठ खेळाडूच्या रूपात आणि तेही फलंदाज म्हणून बेंगलोर संघातील आपल्या वेळेचा आनंद घ्यायचा आहे. आम्ही त्याचाही खूप सन्मान करतो.”
हेसन यांनी हेदेखील सांगितले की, पुढील कर्णधार निवडण्याच्या निर्णयावर विराटचा सल्ला घेण्यात आला होता. विराट आणि बेंगलोरचा माजी खेळाडू एबी डिविलियर्सने फाफ डू प्लेसिसचे समर्थनही केले होते.
“संघातील परिस्थिती बदलली आहे, याचा अर्थ असा होत नाही की, बेंगलोरसाठी सामने जिंकण्याची किंवा जिंकण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही विराटच्या नेतृत्वाच्या पर्यायाबद्दल चर्चा केली आणि फाफ डू प्लेसिस हा तो व्यक्ती होता, जो खरोखर उत्साहित होता. मी आपल्या निर्णयासाठी एबी डिविलियर्सवरही विश्वास ठेवला.”
आयपीएल २०२२ मधील बेंगलोर संघाच्या सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर साखळी फेरीत त्यांचा पहिला सामना २७ मार्चला पंजाब किंग्सविरुद्ध होणार असून शेवटचा सामना १९ मे रोजी होईल. हा शेवटचा सामना बेंगलोरला नवीन फ्रँचायझी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे.
मंधना-हरमनप्रीत जोडीने जिंकली सर्वांचीच मने, युवराज-सचिनकडूनही कौतुक; पाहा खास ट्वीट्स