बुधवारी (२५ मे) आयपीएलमधील एलिमिनेटर सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांसाठी अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या दृष्टीने हा सामना जिंकणे महत्वाचे होते. अतिशय महत्वाच्य या सामन्यात आरसीबीचा वरच्या फळीतील फलंदाज रजत पाटीदार याने शतक ठोकले आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. शतकी खेळीच्या जोरावर पाटीदारने त्याच्या नावावर आयपीएलचा एक महत्वाचा विक्रम देखील केला.
आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plassis) गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रजत पाटीदार (Rajat Patidar) फलंदाजीसाठी आला. विराट आणि पाटीदार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ चेंडूत ६६ धावांची भागीदारी खेली. विराट २४ चेंडूत २५ धावा करून बाद झाला, पण पाटीदारने पुढे शतक ठोकले. त्याने या सामन्यात ५४ चेंडू खेळले आणि यामध्ये नाबाद ११२ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १२ चौकार आणि ७ षटकार निघाले. पाटीदारने केलेले हे शतक आयपीएल २०२२मध्ये सर्वात वेगवान शतक ठरले. सोबत आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये सर्वात कमी चेंडूत केले गेलेल्या शतक देखील ठरले.
Cometh the hour, cometh the man! 🤩🙌🏻
Maiden IPL century for our #3️⃣. ❤️ #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #LSGvRCB #PlayOffs pic.twitter.com/akI5RdymuI
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 25, 2022
प्लेऑफचे सामने हे प्रत्येक संघासाठी महत्वाचे असतात. अशाच या महत्वाच्या सामन्यात पाटीदारने सर्वात वेगवान शतक ठोकले आहे. आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात कमी चेंडूत वैयक्तिक शतक करणाऱ्यांच्या यादीत तो आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने अवघ्या ४९ चेंडूत शतक पूर्ण केले. अनुभवी वृद्धिमान साहा आणि पाटीदार संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर नाव येते विरेंद्र सेहवागचे, ज्याने प्लेऑफच्या एका सामन्यात ५० चेंडूत वैयक्तिक शतक केले होते. मुरली विजय आणि शेन वॉटसन या यादीत बरोबरीवर आहेत. या दोघांनी देखील ५१ चेंडूत शतक केले होते.
आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारे खेळाडू
४९ चेंडू – रजत पाटीदार*
४९ चेंडू – वृद्धिमान साहा
५० चेंडू – विरेंद्र सेहवाग
५१ चेंडू – मुरली विजय
५१ चेंडू – शेन वॉटसन
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! रजत पाटीदारने गाजवली आयपीएल, लखनऊविरुद्ध ४९ चेंडूत शतक ठोकत रचला भीमपराक्रम
अर्रर्र! दुसऱ्या क्वालिफायरआधीच राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, धाकड अष्टपैलूची स्पर्धेतून माघार