राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात शुक्रवारी आयपीएल २०२२ चा दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. उभय संघातील हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ मागच्या अनेक वर्षांपासून आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात अहमदाबादच्या या स्टेडमयमवर वातावरण कसे असेल आणि सामन्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याविषयी महत्वाची माहिती घेऊया.
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RR vs RCB) यांच्यातील या सामन्यात नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. कारण हवेतील दवामुळे चेंडू लवकर ओला होईल आणि गोलंदाजांसाठी अडचणी देखील निर्माण होतील. नाणेफेक जिंकणारा संघ शक्यतो पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेईल. स्टेडियममध्ये पाच काळ्या मातीच्या, तर पाच लाल मातीच्या खेळपट्ट्या आहेत.
काळ्या मातीची खेळपट्टीवर लाल मातीच्या खेळपट्टीपेक्षा चेंडूला अधिक उसळी मिळते. ही खेळपट्टी भिजल्यानंतर लवकर कोरडी पडते आणि फिरकी गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल असते.
तापमानाचा विचार केला, तर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जास्तीत जास्त ४२ तर कमीत कमी २६ ते २९ डिग्री सेल्सियस तापमान असेल. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेवमध्ये हे स्थित आहे. स्टेडियममध्ये एका वेळी १ लाख ३२ हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंत १४ कसोटी, २७ एकदिवसीय आणि ६ टी-२० सामने खेळले गेले आहेत. तसेच आयपीएलचे १६ सामने आतापर्यंत याठिकाणी खेळले गेले आहेत. या १६ सामन्यांमध्ये ८ वेळा प्रथम फलंदाजी करणारा, तर ८ वेळा प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. यापैकी एक सामना सुपर ओव्हरमध्ये निकाली निघाला होता. याठिकाणी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या १६३ राहिली आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने सरासरी १५१ धावा केल्या आहेत.
उभय संघातील या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यानंतर याच स्टेडियमवर आयपीएल २०२२ चा अंतिम सामना खेळला जाईल. २९ मे रोजी खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जिंकणारा संघ असेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘…तर उमरान मलिक भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकतो’, बासीसीआय अध्यक्ष गांगुलीने केले स्पष्ट
‘नशीब चांगलं नव्हतं, पण…’, लखनऊ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर गंभीरचा चाहत्यांना खास संदेश
‘चूका कर आणि लोकांसमोर अपयशी हो’, अश्विनला भारताच्या माजी प्रशिक्षकाने दिलेला अनोखा गुरूमंत्र