---Advertisement---

खराब फॉर्मातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणारा कोहली, आता स्वत:च घेतोय विंडीजच्या दिग्गजाकडून धडे

On: रविवार, एप्रिल 24, 2022 8:13 PM
Brian-Lara-And-Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज विराट कोहली सध्या त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. आयपीएल २०२२ मधील सुरुवाच्या ८ सामन्यात देखील विराट अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. शनिवारी (२३ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने मोठ्या अंतराने आरसीबीला धूळ चारली. या पराभवानंतर विराट वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा यांच्याकडून काही सल्ले घेताना दिसला.

सनराझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात आरसीबी संघाचे प्रदर्शन निराशाजनक राहिले, पण विराट कोहली (Virat Kohli) खाते देखील खोलू शकला नाही. हा आयपीएलच्या चालू हंगामातील सलग दुसरा सामना ठरला, ज्यामध्ये विराटने गोल्डन डकवर (पहिल्या चेंडूवर) विकेट गमावली. विराटच्या आयपीएल कारकिर्दीतील ही पहिली वेळ आहे, जेव्हा तो एका हंगामात दोन वेळा खाते न खोलता तंबूत परतला आहे. त्याने या हंगामातील सुरुवातीच्या ८ सामन्यांमध्ये अवघ्या १७च्या सरासरीने ११९ केल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

अशातच आता खराब फॉर्मशी झगडणारा विराट आणि वेस्ट इंडिजचे माजी महान फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) यांचे सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लारा हैदराबाद संघाचे फलंदाजी प्रसिक्षक आहेत. अशात त्यांच्या संघाकडून पराभव स्वीकारल्यानंतर विराट या महान खेळाडूकडून फलंदाजीचे काही सल्ले घेताना दिसला. चाहत्यांना या दोन दिग्गजांना एकत्र पाहून खूपच आनंद झाला आहे, जो सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, शनिवारी हैदराबात आणि आरसीबी (SRH vs RCB) मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार जर केला, तर हैदराबादने आरसीबीचा लाजिरवाणा पराभव केला आहे. नाणेफेक गमावल्यामुळे आरसीबीला प्रथम फलंदाजी करावी लागली. गोलंदाजी करताना हैदराबादने जबरदस्त प्रदर्शन केले आणि आरसीबीला अवघ्या ६८ धावांवर सर्वबाद केले. प्रत्युत्तरात हैदराबादने हे लक्ष्य एक विकेटच्या नुकसानावर आणि अवघ्या ८ षटकात गाठले.

आरसीबीसाठी विराटव्यतिरिक्त सलामीवीर अनुज रावत आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक देखील शून्य धावांवर बाद झाले. ग्लेन मॅक्सवेल आणि सुयश प्रभुदेसाई या दोघानी दोन आकडी धावसंख्या गाठली, इतर सर्व खेळाडू एक आकडी धावसंख्येवर बाद झाले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आमिर खानला हवीये आयपीएलमध्ये संधी, बॅटिंग पाहून तुम्हीच ठरवा मिळेल की नाही

‘लय पनवतीये तू…’, माजी दिग्गजाने ट्वीट करताच विराट शून्यावर झाला बाद; मग चाहत्यांनीही केले जोरदार ट्रोल

KKRvsGT: ‘टेबल टॉपर’ गुजरातच्या कॅप्टन हार्दिकची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘टूर्नामेंट संपेपर्यंत माझे केस पांढरे होतील’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---