शनिवारी (२३ एप्रिल) आयपीएलमध्ये डबल हेडर खेळला गेला. दिवसाचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. बेंगलोरचा संघ चालू हंगामाच चांगले प्रदर्शन करत आला आहे, पण या सामन्यात संघ खूपच स्वस्तात गुंडाळला गेला. तसेच, आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा गोल्डन डकवर बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर चाहत्यांची चांगलीच निराशा झाली.
आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादचा (RCB vs SRH) हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. शनिवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने अवघ्या ६८ धावांवर त्यांच्या सर्व विकेट्स गमावल्या. आरसीबीला डावातील सर्व २० षटके देखील खेळून काढता आली नाहीत. त्यांचा एकही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. विराट कोहली (Virat Kohli) सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर (शून्य धावांवर) बाद झाला. मार्को जेन्सनने विराटला एडम मार्करमच्या हातात झेलबाद केले. आयपीएलच्या इतिहासात ही पाचवी वेळ आहे, जेव्हा विराटने गोल्डन डकवर विकेट गमावली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यापूर्वी आयपीएलचा पहिला हंगाम म्हणजेच २००८ साली आशिष नेहराने विराटला पहिल्यांदा गोल्डन डकवर तंबूत धाडले होते. त्यानंतर आयपीएल २०१४ मध्ये विराटला दुसऱ्यांना अशा प्रसंगाचा सामना करावा लागला. यावेळी संदीप शर्माने ही कामगिरी केली होती. त्यानंतर आयपीएल २०१७ मध्ये नेथन कुल्टर- नाईलने विराला शून्य धावांवर बाद केले होते. चालू हंगामात विराट दोन वेळा गोल्डन डकवर बाद झाला. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध दुष्मंता चमीराने आणि आता हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मार्को जेन्सनने त्याला गोल्डन डकवर माघारी धाडले आहे.
सामन्यातील आरसीबीच्या प्रदर्शनावर एक नजर टाकली, तर ती खूपच निराशाजनक आहे. आरसीबीचे फक्त दोन फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकले, पण तेदेखील २० धावांच्या आतमध्ये बाद झाले. विराट आणि इतर दोन खेळाडूंनी शून्य धावांवर विकेट गमावली. राहिलेल्या ६ खेळाडूंनी एक आकडी धावसंख्येवर विकेट्स गमावल्या.
या गोलंदाजांनी विराटला आयपीएलमध्ये केले आहे गोल्डन डकवर बाद
२००८- विरुद्ध आशिष नेहरा (मुंबई इंडियन्स)
२०१४- विरुद्ध संदीप शर्मा (पंजाब किंग्ज)
२०१७- विरुद्ध नाथन कुल्टर नाईल (कोलकाता नाइट रायडर्स)
२०२२- विरुद्ध दुष्मंथा चमीरा (लखनऊ सुपर जायंट्स)
२०२२- विरुद्ध मार्को जेन्सन (सनराझर्स हैदराबाद)*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘या’ ठिकाणी खेळला जाणार आयपीएल २०२२चा अंतिम सामना; दर्शकांना १०० टक्के क्षमतेने एन्ट्री
KKR vs GT। फर्ग्युसनच्या अफलातून कॅचने फिरवला सामना; रसेलच्या विकेटमुळे चाहत्यांच्या अपेक्षा धुळीस
आयपीएलच्या एका नियमाने उडवली रिषभ पंतची झोप; वादामुळे बसला थेट कोट्यावधी रुपयांना फटका