---Advertisement---

Video: सीएकेच्या उथप्पाचा अनोखा सराव, पहिल्या सामन्यापासून प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळू शकते संधी

On: गुरूवार, मार्च 10, 2022 10:45 AM
Robin-Uthappa
---Advertisement---

आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. यावर्षी ८ ऐवजी १० संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजराय टायटन्स या दोन नवीन संघांमुळे स्पर्धेचा रोमांच अधिकच वाढला आहे. गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्जवर (CSK) सर्वांच्या नजरा राहतील. सीएसकेचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा आयपीएल सुरू होण्यापूर्वी जोमात सराव करत आहे.

एमएस धोनीच्या नेतृत्वीत सीएसकेने आयपीएल मेगा लिलावात त्यांच्या अनेक जुन्या खेळाडूंना पुन्हा एकदा विकत घेतले आहे. अशात आगामी हंगामात काही नवीन आणि जुन्या खेळाडूंसह सीएसके मैदानात उतरणार आहे. ज्या जुन्या खेळाडूंना सीएसकेने पुन्हा एकदा विकत घेतले, त्यामध्ये अनुभवी रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याचाही समावेश होता. सीएकेने उथप्पाला त्याची बेस प्राइस २ कोटीमध्ये विकत घेतले.

मागच्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये उथप्पाला संधी मिळाली नव्हती. परंतु, शेवटच्या टप्प्यात त्याला संधी मिळाली आणि अंतिम सामन्यात त्याने महत्वाचे योगदान दिले होते. त्याच्या मोठ्या खेळीमुळे सीएसकेने अंतिम सामन्यात विजय मिळवला होता. दरम्यान, आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी सीएसके सुरतमध्ये सराव करत आहे. या हंगामाच्या सुरुवातीपासून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने उथप्पा सराव करत आहे.

भारतीय फलंदाज मोठे शॉट खेळण्याची क्षमता सुधारताना दिसत आहेत आणि यासाठी ते अलिकडच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने सरावही करतात. सीएसकेनेही उथ्थपाचा असाच एक व्हिडओ शेअर केला आहे. व्हिडिओत उथप्पा खेळपट्टीच्या एका बाजूने मोठे शॉट खेळत-खेळत दुसऱ्या बाजूपर्यंत जात आहे. यादरम्यान, उथप्पा बॅटने चेंडू लांब मारण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1501576716765990916?s=20&t=iOieN4zTl4qWuz5DwRUwag

उथप्पाने केलेला हा सराव मैदानात किती यशस्वी ठरतो, हे २६ मार्चाला आयपीएल सुरू झाल्यावर कळेल. आयपीएल २०२२ च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज मैदानात उतरणार आहे. मागच्या वर्षी सीएसके आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन संघ अंतिम सामन्यातपर्यंत पोहोचले होते. याच कारणास्तव आगामी हंगामाची सुरुवात याच संघांच्या सामन्यासह होईल. यावर्षी आयपीएल स्पर्धा दोन ग्रुपमध्ये खेळली जाणार आहे. सीएसके ग्रुप बी मध्ये आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---