आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करणार आहे. आरसीबीचा कर्णधार बनण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज सलामीवीर फाफ डू प्लेसिस या दोघांमध्ये चढाओढ होती. आता अशी माहिती समोर येत आहे की, फ्रेंचायझीने अखेर डू प्लेसिसला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची अधिकृत घोषणा १२ मार्च रोजी केली जाईल.
आरसीबी संघ १२ मार्चला संघाची नवीन जर्सीही जगासमोर असून शकतो. इनसाइडस्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार कर्णधार आणि जर्सीची घोषणा १२ मार्चला केली जाईल. सूत्राने सांगितल्यानुसार, त्यादिवशी आपल्याला समजेल की, कर्णधार कोण आहे. हा एक कठीण निर्णय होता, आश्चर्यकारक नव्हता. आरसीबी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषदेत त्यांच्या कर्णधाराची घोषणा करेल, त्यात संघ त्यांची जर्सीही लॉन्च करेल. असे मानले जात आहे की, ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पहिल्या तीन सामन्यांसाठी उपस्थित नसणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील सर्व खेळाडूंना ५ एप्रिलपर्यंत आयपीएलमध्ये सहभाग घेण्यासाठी मनाई केली आहे. त्यांचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका संपल्यानंतर ६ एप्रिलपासून सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलमध्ये सहभाग घेऊ शकतात. याच कारणास्तव आरसीबीने दक्षिण अफ्रिकी दिग्गजाला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला असावा.
सूत्राने सांगितले की, याच कारणास्तव आरसीबी फाफ डू प्लेसिसकडे (Faf du Plessis) संघाची कमान सोपवेल. त्याने सांगितले की, डू प्लेसिसकडे विश्वचषकासह क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये संघाचे नतृत्व करण्याचा अनुभव आहे. तो विराट कोहलीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करणाचा अनुभव असलेला एकमात्र पर्याय आहे. तसेच तो आयपीएलच्या पूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहणार आहे. दुसरा पर्याय ग्लेन मॅक्सवेल होता, ज्याच्यावर आधी विचार झाला होता, पण तो पहिल्या काही सामन्यांसाठी अनुपस्थित असेल. दरम्यान, आगामी आयपीएल हंगामात आरसीबीला त्यांचा पहिला सामना २७ मार्चला पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचा आहे.
https://twitter.com/RCBTweets/status/1500852853061353472?s=20&t=dDXbDGf-U5hV1uTMnucfiA
फाफ डू प्लेसिसची आत्तापर्यंत आयपीएलमधील कामगिरी दमदार झाली आहे. तो २०२१ हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने गेल्या अनेक वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्त्व केले होते. पण, आयपीएल २०२२ पूर्वी चेन्नईने त्याला मुक्त केले आणि लिलावात बेंगलोरने त्याच्यावर ७ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या गोटात सामील करून घेतले.
महत्वाच्या बातम्या –
असे दोन खेळाडू ज्यांनी ‘रनमशिन’ विराट सोबत केले कसोटी पदार्पण, मात्र….
पाकिस्तानात ७१ वे शतक ठोकणार विराट कोहली? पोस्टर अन् बॅनर घेऊन चाहते रावळपिंडी कसोटीत हजर






