आयपीएल २०२२ चा ५८ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात खेळला गेला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि ११ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. फलंदाजांप्रमाणेच क्षेत्ररक्षणात कमलेश नागरकोटीने एक महत्वाचा झेल पकडला आणि राजस्थानला मर्यादित धावसंख्येवर रोखले.
राजस्थान रॉयल्सचा मध्यक्रमातील फलंदाज देवदत्त पडिक्कल चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि खेळपट्टीवर सेट देखील झाला होता. पडिक्कलने ३० चेंडूत ४८ धावा केल्या होत्या आणि तितक्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्कियाने त्याला कमलेश नागरकोटी (Kamlesh Nagarkoti) याच्या हातून झेलबाद केले. नागरकोटीने हा अवघड झेल पकडल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पडिक्कलने केलेल्या धावांमध्ये त्याच्या ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
What a catch by Kamlesh Nagarkoti! @DelhiCapitals #RRvDC pic.twitter.com/wQoOtWL6u5
— kishore (@_kshore_) May 11, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) बाद झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सला मोठा झटका बसला. कारण, तो पूर्णपणे सेट झाला होता आणि शेवटच्या षटकांमध्ये संघाला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकत होता. त्याने डावाच्या १९ व्या षटकात पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली. पडिक्कलने हा चेंडू कवर्सच्या दिशने हवेत मारला, पण बॅटवर नीट न बसल्यामुळे तो जास्त लांब जाऊ शकला नाही. चेंडू हवेत असताना सीमारेषेजवळील नागरकोटी तो झेलण्यासाठी धावत सुटला. धावत त्याने मोठे अंतर कापले आणि जवळ आल्यानंतर उत्कृष्ट डाइव्ह मारत झेल पकडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Did You Watch – Super sub Kamlesh Nagarkoti takes a tremendous diving catch.
📽️📽️https://t.co/62vnRvQVn9 #TATAIPL #RRvDC
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2022
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ६ विकेट्सच्या नुकसानावर १६० धावा उभ्या केल्या. त्यानंतर १६१ धावांचे हे लक्ष्य दिल्लीच्या फलंदाजांनी १८.१ षटकात आणि २ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. यामध्ये त्यांच्या मिचेल मार्शने ६२ चेंडूत सर्वाधिक ८९ धावा चोपल्या. तर राजस्थानसाठी रविचंद्र अश्विनने ३८ चेंडूत ५० धावांचे योगदान दिले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रियान पराग निघाला राजस्थानचा ‘डॉन’, दिल्लीच्या घातक गोलंदाजाच्या भेदक चेंडूवर मारला ९६ मीटरचा षटकार
लॅपटॉप नाही, कागद-पेनाने बनवली रणनीती; कोच नेहराने नवख्या गुजरातला असे बनवले ‘चँपियन’
दिल्लीला धक्का? पृथ्वी शॉच्या पुनरागमनाबद्दल धक्कादायक अपडेट, वाचा काय म्हणाले कोच पाँटिंग