युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल भारतीय संघाचा भविष्यातील महत्वाचा खेळाडू असेल, असे अनेकांना वाटते. शुक्रवारी (२७ मे) जयस्वालने आयपीएल २०२२च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जे प्रदर्शन केले, ते पाहून अशा चर्चांना अधिक जोर मिळाला. जयस्वाल आणि जोस बटलरने मिळून राजस्थानला चांगली सुरुवात मिळवून दिली. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला मात्र जयस्वालने घाम घोडला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रथम फलंदाजी केली ८ विकेट्सच्या नुकसानावर १५७ धावा केल्या. लक्ष्याचा पाढलाग करण्यासाठी जेव्हा राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर खेळपट्टीवर आले, तेव्हा त्यांनी पहिल्या षटकापासून मारधाड सुरू केली. राजस्थानच्या डावातील पहिले षटक मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) घेऊन आला. पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने सिराजची चांगलीच धुलाई केली.
डावाच्या पहिल्या षटकात रजास्थनचे सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आणि जयस्वाल सावकाश सुरुवात करतील, असा सर्वांचा अंदाज होता, पण डावाच्या पहिल्याच षटकात जयस्वालने सिराजला निशाण्यावर धरले. सिराजने टाकलेल्या या षटकात जयस्वालने २ षटकार आणि एक चौकार मारत १६ धावा घेतल्या. सिराज या षटकात शॉर्ट चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात होता, पण जयस्वालने त्याचे सर्व प्रयत्न उलथवून टाकले.
सलामीवीर बटलर आणि जयस्वालने पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. जयस्वालने पहिल्या षटकात धमाकेदार सुरुवात केली असली, तरी मोठी खेळी करू शकला नाही. त्याने १३ चेंडूत २१ धावा केल्या आणि विकेट गमावली. बटलरने मात्र हंगामातील वैयक्तिक चौथे शतक ठोकले आणि संघाला विजय मिळवून दिला. बटलरने अवघ्या ६० चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०६ धावा केल्या.
आरसीबीने अवघ्या ९.१ षटकात १०० धावा पूर्ण केल्या होत्या. शेवटी १५८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना एकूण १८.१ षटके खेळावे लागले. यादरम्यान त्यांनी ३ विकेट्स गमावल्या. क्लालिफायर एकमध्ये राजस्थान गुजरात टायटन्सकडून पराभूत झाला होता. आता अंतिम सामन्यात राजस्थान पुन्हा एकदा गुजरातशी भिडणार आहे. अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थान दुसऱ्यांदा खेळणार IPL फायनल! पाहा सर्वाधिकवेळा अंतिम सामना खेळणाऱ्या संघांची संपूर्ण यादी