इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने स्थान पक्के केले. क्वालिफायर दोनमध्ये राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ७ विकेट्सने मात दिली. आता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये २९ मे रोजी अंतिम सामना खेळला जाईल. आरसीबीचा युवा फलंदाज रजत पाटीदार राजस्थानविरुद्धच्या सामन्यात देखील चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण रविचंद्रन अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात तो अडकला.
एलिमिनेटर सामन्यात रजत पाटीदार (Rajat Patidar) सामनावीर ठरला होता. त्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात शतक ठोकले होते आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिलेली. एलिमिनेट सामना जिंकल्यानंतर आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्वालिफायरमध्ये शुक्रवारी (२७ मे) भिडले. पाटीदार या सामन्यात देखील धमकेदार खेळी करण्याच्या विचारात होता, पण राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने त्याला बाद करण्यासाठी चेंडू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्याकडे दिला.
पाटीदारची विकेट राजस्थानसाठी महत्वाची होती, कारण तो शेवटच्या षटकांमध्ये आरसीबीला खूप धावा करून देऊ शकत होता. आरसीबीच्या डावातील १६वे षटक अश्विन घेऊन आला. पहिल्या चेंडवूर लोमलोर स्ट्राईकवर होता आणि त्याने एक धाव घेऊन पाटीदारला स्ट्राईक दिली. षटकातील दुसऱ्या चेंडूवर पाटीदारने एक उत्कृष्ट षटकार मारला. त्यांतर तिसऱ्या चेंडूवर देखील त्याने षटकार मारण्यासाठी बॅट फिरवली, पण चेंडू सीमारेषेपार जाऊ शकला नाही.
त्याने मारलेला शॉट दमदार होता, सीमारेषेजवळ उभा असलेल्या जोस बटलरने तो झेलला. बटलरने झेल पकडल्यानंतर त्याचा पाय सीमारेषेला लागला आहे की, नाही याविषयी थोडा संशय होता, पण तिसऱ्या पंचांनी तो दूर केला. झेल पकडल्यानंतर जोस बटलर (Jos Buttler) एका जागेवर उभा राहिला. नंतर त्याला तोल बिघडला आणि त्याने चेंडू थोडा वर फेकून पुन्हा झेलला. त्याला पाटीदारचा झेल घेण्यासाठी तशी जास्त काही कसरत करावी लागली नाही.
जोस बटलरने घेतलेला पाटीदारचा झेल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, पाटीदारने या सामन्यात आरसीबीसाठी ४२ चेंडूत सर्वाधिक ५८ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. कर्णधार फाफ डू प्लेसिस (२५) आणि ग्लेन मॅक्सवेल (२४) यांच्या योगदानामुळे आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या नुकसानावर १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात जोस बटलरने हंगामातील त्याचे वैयक्तिक चौथे शतक ठोकले आणि राजस्थानला अंतिम सामन्यात पोहोचवले. बटलरने ६० चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. १८.१ षटकात त्यांच्या संघाने विजय मिळवला. राजस्थानसाठी प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मेकॉय यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलग ३ षटकार देत हुकवली होती मोठी संधी, आता तोच प्रसिद्ध कृष्णा बनला राजस्थानच्या विजयाचा हिरो
‘हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग’, डू प्लेसिसच्या शब्दांनी जिंकली कोट्यावधी भारतीयांची मनं