इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये १० संघांनी आपले पहिले सामने खेळले आहेत. पंजाब किंग्सने राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला. आता दूसऱ्या सामन्यापूर्वी दिल्लीचा माजी खेळाडू शिखर धवन याचा सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पंजाब किंग्सच्या खेळाडूंसोबत डान्स करताना दिसत आहे. त्याला पंजाब संघाने ८.२५ कोटींची बोली लावत विकत घेतले आहे.
शिखर धवनने (Shikhar Dhawan) शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये कगिसो रबाडा, ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंह आणि हरप्रीत ब्रार हे डान्स करताना दिसत आहेत. पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) खेळाडूंनी आपल्या डान्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या व्हिडीओला ६ लाखांहून अधिक लाइक्स आल्या आहेत. धवनने पोस्टमध्ये लिहले आहे की, ‘पंजाबी तडका आणि कॅरेबियन मस्ती.’
https://www.instagram.com/reel/CbsAp-aqhSt/?utm_source=ig_embed&ig_rid=fa44445c-defc-4483-ade0-ce869a75a97b
मयंक अगरवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स संघाने रविवारी (२७ मार्च) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये आरसीबीविरुद्ध २०६ धावांचे लक्ष्य गाठत सामना जिंकला. शिखर धवन आणि भानुका राजपक्षाने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ओडियन स्मिथने नाबाद ८ चेंडूत २५ धावा केल्या. स्मिथसोबत शाहरुख खानने चांगली भागिदारी केली आणि त्याने २४ धावा केल्या.
गुणतालिकेत पंजाब किंग्स संघ २ पाॅइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबचा दूसरा सामना शुक्रवारी (१ एप्रिल) केकेआर संघासोबत आहे. आयपीएल २०२२ च्या बदललेल्या स्वरुपानुसार पंजाबला बी गटात आरसीबी, सीएसके, गुजरात आणि हैद्राबाद या संघांसोबत ठेवण्यात आले आहे.
पंजाब किंग्स संघ-
शिखर धवन, मयंक अगरवाल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेयरस्टो, राहुल चाहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, ईशान पोरेल, लियाम लिविंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषि धवन, प्रेरक मांकड, वैभव अरोरा, ऋतिक चॅटर्जी, बलतेज ढांडा, अंश पटेल, नॅथन ऍलिस, अर्थव तायडे, भानुका राजपक्षे आणि बॅनी हॉवेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियन महिला ९ व्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये, वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये पराभूत
Video: विटांच्या वेगवेगळ्या रचना करताना दिसला चेन्नई संघ, धोनी-जडेजाचाही उपक्रमात सहभाग
आता १९ वर्षांखालील महिला विश्वचषकही खेळला जाणार! स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबतही मोठी घोषणा