रविवारी (१ मे) एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला आणि ही जबाबदारी स्वीकारताच संघाला विजय देखील मिळवून दिला. सीएसकेला मिळालेला हा चालू हंगामातील तिसरा विजय आहे आणि यासाठी संघाचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी महत्वाचे योगदान दिले. ऋतुराजला त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी सामनावीर निवडले गेले. हा सन्मान स्वीकारल्यानंतर त्याने खास प्रतिक्रिया दिली.
सीएसकेने हा सामना १३ धावांनी जिंकला. नाणेफेक गमावल्यानंतर सीएसकेने प्रथम फलंदाजी केली आणि २ विकेट्सच्या नुकसानावर २०२ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज जेव्हा २०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आले, तेव्हा त्यांना हे लक्ष्य गाठता आले नाही. हैदराबादने मर्यादित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या आणि १३ धावांनी पराभव स्वीकारला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांच्या धमाकेदार फलंदाजीमुळे सीएसकेला ही मोधी धावसंख्या उभी करता आली आणि विजय देखील मिळवता आला. ऋतुराज या सामन्यात शतक करेल असे सर्वांनाच वाटले होते, पण अवघी एक धाव कमी असताना तो टी नटराजनच्या चेंडूवर झेलबाद झाला. परंतु त्याच्या ९९ धावा संघासाठी बहुमूल्य ठरल्या. सामनावीर निवडले गेल्यानंतर खूप चांगले वाटत असल्याचे त्याने सांगितले.
ऋतुराज म्हणाला की, “अशी खेळी करून खूप चांगले वाटत आहे. जेव्हा तुमचा संघ जिंकतो आणि तुम्ही चांगली खेळी करता, तेव्हा हे खूप खास असते. पहिले काही सामने माझ्यासाठी चांगले राहिले नाही, पण मी प्रत्येक सामन्यात शून्यापासून सुरूवात करण्यावर विश्वास ठेवतो, ज्यामुळे मला मदत मिळते.”
पुढे बोलताना कॉनवेसोबत झालेल्या चर्चेचा त्याने खुलासा केला. त्याच्या मते विरोधी संघाच्या वेगवान गोलंदाजीमुळे त्याला धावा करणे अधिकच सोपे होऊन बसले. “मला गती आवडते. जेव्हा चेंडू चांगल्या गतीने येतो, तेव्हा मला माझे शॉट सहज खेळता येतात. मझा प्रयत्न होता की, खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालवावा. मी कॉनवेला देखील हेच सांगत होतो की, मला या खेळपट्टीची चांगली माहिती आहे. त्यामुळेच मी त्याला सांगितले की, टिकून खेळ, धावा आपोआप मिळतील,” असेही ऋतुराज म्हणाला.
दरम्यान, उभय संघातील या सामन्यात ऋतुराजच्या बेटमधून ९९ धावांची धमाकेदार खेळी निघाली. यासाठी त्याने ५७ चेंडू खेळले आणि ६ चौकारांसह ६ षटकार देखील ठोकले. कॉनवेसोबत त्याने १०७ चेंडूत १८२ धावांची भागीदारी देखील साकारली, जी सीएकेच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. कॉनवेने ५५ चेंडूत वैयक्तिक ८५ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गौतम गंभीरने जेंटलमन क्रिकेटच्या प्रतिमेला केले मलिन! विजयानंतर दिसला शिवीगाळ करताना
दिल्लीच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा मोहसिन खान आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर