इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या चालू हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक तुफानी फॉर्ममध्ये दिसला आहे. चालू हंगामातील १२ सामन्यांमध्ये त्याने २०० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने २७४ धावा केल्या आहेत. यादरम्यान तो ८ वेळा नाबाद राहिला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. अशात फॉर्ममध्ये असलेल्या कार्तिकला विश्वचषक संघात स्थान मिळणार की नाही, याविषयी अनेकांना प्रश्न पडला आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी याबाबतीत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
मागच्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी एकत्र समालोचकाची भूमिका पार पाडली आहे. याच पार्श्वभूमीवर गावसकर म्हणाले की, “इंग्लंडमध्ये मागच्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आम्ही सोबत समालोचन केले होते. त्याआधी आम्ही खूप वेळ एकत्र घालवला होता. मला माहिती आहे की, टी२० विश्वचषक २०२१ आणि २०२२मध्ये खेळण्यासाठी तो किती इच्छुक आहे. २०२१ टी२० विश्वचषक तो खेळू शकला नाही, पण यावर्षी त्याने आयपीएल २०२२मध्ये जो खेळ दाखवला आहे, जर मी निवडकर्ता असतो, तर मी त्याला नक्कीच वर्षाच्या शेवटी खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषक संघात निवडले असते.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गावसकरांच्या मते, ३६ वर्षीय कार्तिकच्या वयाकडे न पाहता, त्याच्या फॉर्मकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्याला संघात घेतले पाहिजे. “तुम्ही त्याच्या वयाचा विचार करू नका, तो २० षटके यष्टीरक्षण करू शकतो आणि नंतर फलंदाजी देखील करू शकतो, ती देखील एवढ्या गरम वातावरणात. त्याच्या फॉर्मकडे पाहिले पाहिजे. यष्टीरक्षकाचे पर्याय पाहिले तर, केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण रिषभ पंतविषयी बोलायचे झाले, तर त्याचा फॉर्म थोडा बिघडलेला आहे.”
“फॉर्म खूप गरजेचा आहे. असे म्हटले जाते की, फॉर्म टेंपररी आहे आणि क्लास पर्मनंट आहे. परंतु जर क्लास खेळाडू फॉर्ममध्ये असेल, तर त्याला संघात निवडले गेले पाहिजे. ज्या पद्धतीने तो अलीकडे फलंदाजी करत आहे, त्याला फलंदाजाच्या रुपात संघात घेतले पाहिजे आणि तो यष्टीरक्षक पर्यायी पाहिजे,” असे गावसकर म्हणाले.
दरम्यान, कार्तिकच्या शेवटच्या षटकांमधील फटकेबाजीच्या जोरावर त्याने हंगामातील काही सामने आरसीबीला जिंकवून दिले आहेत. गुणतालिकेत सध्या त्यांचा सघ चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी १२ पैकी ७ सामने जिंकले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युझवेंद्र चहललाही पुरून उरला हसरंगा; आरसीबीच्या गोलंदाजी प्रशिक्षकांनी केले तोंडभरून कौतुक
बसमध्ये पाँटिंगची एंट्री होताच, दिल्लीच्या खेळाडूंनी गायले ‘सैयाँ’, पाहा Funny Video
Video: विजयाचा जल्लोष! वॉर्नरने ‘हाऊज द जोश’ म्हणताच, सहकाऱ्यांनीही मिसळला सुरात सूर