---Advertisement---

Video: उमरान मलिक आयपीएलमध्ये करणार धमाका! सरावातच टाकलाय ताशी १५५ किमी वेगानं चेंडू

On: शुक्रवार, मार्च 25, 2022 11:03 AM
Umran-Malik
---Advertisement---

आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात शनिवारी (२६ मार्च) होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. आगामी हंगामासाठी सर्व संघ तयारी करत आहेत आणि इंट्रा स्क्वॉड सामने देखील खेळले जात आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या कॅम्पमध्येही इंट्रा स्क्वॉड सामना खेळला गेला, ज्यामध्ये त्यांच्या युवा गोलंदाजाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या गोलंदाजाचे नाव आहे उमरान मलिक.

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचे मागच्या आयपीएल हंगामातील प्रदर्शनावर एक नजर टाकली, तर ते खूपच निराशाजन दिसते. त्यांना मागच्या संपूर्ण हंगामात फक्त तीन सामने जिंकले होते आणि गुणतालिकेत त्यांचा संघ सर्वात खालच्या स्थानावर होता. संघातील दिग्गज डेविड वॉर्नर (David Warner) याला कर्णधारपद सोडावे लागले होते, तर काही सामन्यांमध्ये वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधून देखील बाहेर ठेवले गेले होते.

परंतु, या सर्व घडामोडींमध्ये उमरान मलिक (Umran Malik) मात्र त्याच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे चर्चेत आला होता. मागच्या आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान चेंडू देखील उमराननेच टाकला होता. मुळचा जम्मू कश्मीरचा असलेला २२ वर्षीय उमारन मलिक आयपीएल २०२२ साठी या महिन्याच्या सुरुावतीपासूनच सराव करत आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या कॅम्पमध्ये बुधवारी (२३ मार्च) इंट्रा स्क्वॉड सामना खेळला गेला. यादरम्यान उमारनने १५५ किमीच्या ताशी वेगाने गोलंदाजी केल्याचे दिसले. त्याच्या चेंडूचा वेग पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. खेळपट्टीवरी वेस्ट इंडीजचा दिग्गज निकोलस पूरन (Nicholas Pooran) देखील त्या चेंडूचा सामना करू शकलेला नाही. उमरानच्या दुसऱ्याच चेंडूवर पूरनने स्वतःची विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्सच्या कॅम्पमधील हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२२ साठी मागच्या महिन्यात बीसीसीआयने मेगा लिलाव आयोजित केला होता. मेगा लिलावात सनरायझर्सने अनेक नवीन खेळाडूंना संघात सामील केले, तर काही महत्वाचे खेळाडू होते, ज्यांना त्यांनी लिलावापूर्वीच रिटने केले होते. उमरान मलिक देखील सनरायझर्सने रिटेन केलेल्या तीन खेळाडूंमध्ये सहभागी होता. उमरान मलिक, केन विलियम्सन आणि अष्टपैलू अब्दुळ समद या तिघांनी सनरायझर्स हैदरबातने रिटेन केले होते.

दरम्यान, उमरान मलिकला आगामी हंगामात दक्षिण अफ्रिकी दिग्गज डेल स्टेनचे मार्गदर्शन लाभणार आहे. डेल स्टेनला सनरायझर्स संघाने आगामी हंगामासाठी वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---