आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जसाठी खूपच निराशाजनक राहिली आहे. सीएसकेने त्यांच्या सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून ६ विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर त्यांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. सीएसके आणि आयपीएलची नवीन फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात गुरुवारी (३१ मार्च) आमना सामना झाला. या सामन्यात लखनऊने ६ विकेट्स राखून सीएसकेला धूळ चारली आहे. या पराभवानंतर सोशल मीडियावर नेटकरी सीएसकेला ट्रोल करत आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सीएसके (LSG vs CSK) सामन्याचा विचार केला, तर सीएसकेने मोठी धावसंख्या करूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. लखनऊने नाणेफेक जिंकून सीएसकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ७ विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने हे लक्ष्य १९.३ षटकात आणि ४ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. परिणामी लखनऊने हा सामना ६ विकेट्सने जिंकला.
लखनऊच्या विजयात वेस्ट इंडीजचा सलामीवीर फलंदाज एविन लुईस (Evin Lewis) आणि युवा आयुष बदोनीने (Ayush Badoni) महत्वाची भूमिका बजावली. तसेच यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आणि कर्णधार केएल राहुल यांची संघाला एक चांगली सुरुवात दिली. शेवटच्या षटकांमध्ये लुईस आणि बदोनी या दोघांच्या निर्भीड खेळीमुळे लखनऊने विजय मिळवला. लुईसने या सामन्यात २३ चेंडूत ५५ धावा केल्या, तसेच बदोनीने अवघ्या ९ चेंडूत १९ धावा दिल्या.
आयपीएल २०२२ च्या पहिल्या आणि दुसऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ सीएसके पराभूत झाल्यामुळे नेटकरी सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. सीएसकेला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहेत, तर दुसरीकडे लखनऊसाठी महत्वाची खेळी केलेल्या आयुष बदोनी आणि लुईसचे मात्र कौतुक होत आहे.
लखनऊ आणि सीएसके सामन्यानंतर व्हायरल होत असलेले मिम्स –
https://twitter.com/Jacksparrow9807/status/1509594163775705088?s=20&t=_FdVk16iz-K4sEohLHySsQ
LSG 😍😍😍 KL Rahul .. Lewis badoni ❤️❤️.. @klrahul11 @LucknowIPL ❤️❤️❤️ pic.twitter.com/NhlB8XCRSI
— ganesh@yadav (@ganesh_yadav_96) March 31, 2022
https://twitter.com/kunaalyaadav/status/1509765141230882818?s=20&t=D81RkDeI8vNgOSLK4QsDSQ
https://twitter.com/ar_savit/status/1509593200910270466?s=20&t=1ezltV4VogW3lpICZnAlJQ
https://twitter.com/Shamsihaidri1/status/1509749576600678402?s=20&t=1ezltV4VogW3lpICZnAlJQ
https://twitter.com/continuum_0/status/1509592794511273985?s=20&t=1ezltV4VogW3lpICZnAlJQ
Unbelievable Match 😯😯 #CSKvLSG 🏏
Awesome Winning Match …. !! pic.twitter.com/IsLrnQRNtg
— Anas Sid (@Anas0786Sidz) March 31, 2022
https://twitter.com/Itz_Pokkiri5/status/1509561594463719429?s=20&t=1ezltV4VogW3lpICZnAlJQ
Csk fans to shivam Dube :- #CSKvLSG pic.twitter.com/WlJ41t4AvO
— Jayprakash MSDian™ 🥳🦁 (@ms_dhoni_077) March 31, 2022
Dhoni to Shivam Dube in dressing room#CSKvLSG pic.twitter.com/s6LZAIWUHa
— abbhhiiiiiiii (@abbhhiiiiiii) March 31, 2022
Dube to Csk fans … 🤣#CSKvLSG pic.twitter.com/ONOHY0c5hh
— Suffering (@UnfrndSumitNow) April 1, 2022
दरम्यान सामन्याचा विचार केला, तर सीएकेने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली, पण लखनऊच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ७ विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने ४ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.३ षटकात २११ धावा करून विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या –
गंभीरचं धोनीसोबतचं नातं आहे ‘खंबीर’! लखनऊच्या मेंटॉरने चेन्नईच्या माजी कर्णधाराची घेतली भेट, Photo
आयपीएलला मिस करतोय सॅम करन; म्हणाला, ‘मला आयपीएलमध्ये सहभागी व्हायचे होते, पण…’