आयपीएलमध्ये विराट कोहली आणि एबी डिविलियर्स ही जोडी खूपच लोकप्रिय होती. पण मागचा आयपीएल हंगाम संपल्यानंतर विराट आणि डिविलियर्सची जोडीही तुटली. डिविलियर्सने निवृत्ती घेतल्यानंतर विराटने देखील संघाचे कर्णधारपद सोडले. जबाबदारी कमी झाली असली, तरी विराट अद्याप अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाहीये. अशातच आता त्याने डिविलियर्स आरसीबीमध्ये पुनरागमन करेल, असे संकेत दिले आहेत.
आयपीएल २०२१ नंतर एबी डिविलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेमधून निवृत्ती घेतली. डिविलियर्सच्या निवृत्तीपासून विराटचे देखील संघात मन लागत नसल्याचे दिसत आहे. कामाच्या तानामुळे विराटने आरसीबीचे कर्णधारपद देखील सोडले. चाहत्यांना देखील विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डिविलियर्स (AB De Villers) जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायला नक्की आवडेल. विराटने डिविलियर्सच्या पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त केली आहे. आरसीबीने शेअर केलेल्या एका खास पोस्टमध्ये विराट याविषयी बोलत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विराट म्हणाला की, “मला डिविलियर्सची खूप आठवण येते. मी त्याच्यासोबत नेहमीच बोलत असतो. तो नुकताच त्याच्या कुटुंबासोबत यूएसमध्ये होता आणि गोल्फचा आनंद घेत होता. आरसीबीकडे देखील त्याचे लक्ष आहे आणि अपेक्षा आहे की, पुढच्या हंगामात कोणत्या ना कोणत्या भूमिकेत तो संघासोबत दिसेल.”
यादरम्यान विराट स्वतःच्या खराब फॉर्मविषयी देखील बोलला. विराट चालू आयपीएल हंगामात तीन वेळा शून्यावर बाद झाला आणि तिन्ही वेळा गोल्डन डक म्हणजेच पहिल्या चेंडूवर त्याने विकेट गमावली. याविषयी बोलताना विराट म्हणाला की, “माझ्यासोबत कारकिर्दीत असे पहिल्यांदाच झाले आहे. त्यामुळे बाद झाल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर एक हास्य होते. मला हे जाणवले की, या खेळात जे काही पाहायचे होते, ते सर्व पाहिले.”
आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मागच्या २ वर्षात अपेक्षित प्रदर्शन न केल्यामुळे विराटवर टिका करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. विराटच्या मते त्याच्यावर टिका करणारे टिकाकार त्याची परिस्थिती समजून घेऊ शकत नाहीत. टिकाकारांना ते जाणवू शकत नाही, जे मला जाणवत आहे, असे विराट म्हणाला. दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये विराटने आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये २१६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचा देखील समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पायातून बूट निसटल्यावरही मुलीने जिंकली २०० मीटरची शर्यत, व्हायरल Video तुम्हालाही करेल प्रेरित