---Advertisement---

मुंह से ‘वडा पाव’ छीन लिया; मुंबईविरुद्ध कमिन्सच्या १४ चेंडूतील अर्धशतकावर विस्फोटक क्रिकेटरकडून स्तुती

Pat-Cummins-Against-Mumbai-Indians
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा चौदावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. आयपीएलच्या मागच्या हंगामात सर्वात महाग खेळाडू ठरलेल्या पॅट कमिन्सने नव्या हंगामात धमाकेदार पुनमरागमन केले आहे. त्याने मुंबईविरुद्ध विस्फोटक खेळी खेळत रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. त्याने केवळ १४ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या विक्रमात केएल राहुल याची बरोबरी केली आहे. यानंतर क्रिकेटविश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईने कोलकाताविरुद्ध (MI vs KKR) फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ४ विकेट्सच्या नुकसानावर १६१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरकडून सलामीला येत वेंकटेश अय्यर याने नाबाद अर्धशतक केले. त्याच्याव्यतिरिक्त खालच्या फळीत पॅट कमिन्स (Pat Cummins) याने ताबडतोब अर्धशतक (Pat Cummins Half Century) झळकावले. त्याने केवळ १५ चेंडू खेळताना ६ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावा फटकावल्या.

कमिन्सच्या या धुव्वादार खेळीनंतर आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या माजी भारतीय दिग्गज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने त्याचे कौतुक केले आहे. त्याने कमिन्सची स्तुती करताना लिहिले आहे की, ‘तोंडातून घास काढून घेतला, माफ करा.. वडा पाव काढून घेतला. कमिन्सने आतापर्यंतच्या सर्वात क्लिन हिटिंगचा नजारा दाखवला आहे. १५ चेंडूंमध्ये ५६ धावा…’

पॅट कमिन्सने केलेले विक्रम
पॅट कमिन्सने मुंबईविरुद्ध ४४०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटसह खेळल्या गेलेल्या डावांमध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची खेळी ठरली.

आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट राखून खेळल्या गेलेल्या डावांचा विचार केला, तर पहिल्या क्रमांकावर कृणाल पांड्याचे नाव येते, ज्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ५००च्या स्ट्राईक रेटसह ४ चेंडूत नाबाद २० धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्डचे नाव येते. तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस मॉरिस आहे, ज्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाविरुद्ध ४२२च्या स्ट्राईक रेटने ९ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या होत्या. त्यानंतर यादीच चौथ्या क्रमांकावर अक्षर पटेलचे नाव येते, ज्याने सीएकेविरुद्धच्या एका सामन्यात ५ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या होत्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

एमएस धोनीच्या आयपीएल जाहिरातीविरुद्ध तक्रार दाखल; केलंय ‘या’ नियमांचं उल्लंघन

केकेआरच्या नवख्या गोलंदाजापुढे दिग्गज रोहितने टाकल्या नांग्या, पहिल्याच षटकात काढला घाम

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज वॉर्नर पुन्हा एकदा दिल्लीच्या ताफ्यात सामील; कर्णधाराकडून शिकायचाय ‘हा’ शॉट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---