यंदाच्या १५व्या आयपीएल हंगामात चाहत्यांचा रोमांच आधीपेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. यावर्षी स्पर्धेत ८ ऐवजी १० संघ सहभागी झाले असले, तरी त्याचा कोणताच चांगला परिणाम अद्याप पाहायला मिळाल नाहीये. या हंगामात टीव्हीवर सामना पाहणाऱ्यांची संख्याही घटली आहे. सर्वात यशस्वी आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यावर्षी खराब प्रदर्शन करत आहेत. तसेच, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे धुरंधर अपयशी ठरताना दिसत आहेत.
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहेत. लखनऊ सुपर जायंंट्सविरुद्ध गोल्डन डकवर (शून्य धावांवर बाद) विकेट गमावल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर नाराजी खूप काही सांगून जात होती. असेच काहीसे रोहितसोबतही घडले आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने हंगामातील सुरुवातीचे सलग ६ सामने गमावले आहेत. दोन्ही दिग्गज खेळाडू मानसिक स्वरूपात थकल्याचे दिसत आहे.
रोहित शर्मा आयपीएल २०२२मध्ये फलंदाजांच्या यादीत ३६व्या क्रमांकावर घसरला आहे. त्याने चालू हंगामात आतापर्यंत ११४ धावा केल्या आहेत. यामध्ये ४१ ही त्याची सर्वात मोठी धावसंख्या राहिली आहे. या धावा त्याने १९च्या सरासरीने आणि १२९.५४च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. विराट देखील रोहितपेक्षा अवघ्या दोन स्थानांनी पुढे आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत ११९ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी १९.८३ आणि स्ट्राईक रेट १२३.९५चा राहिला आहे. असे अनेक युवा खेळाडू आहेत, ज्यांना हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये यो दोघांपेक्षा खूप चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे. असे असले, तरी या दोघांचा अनुभव मोठा आहे, जो संघाच्या नेहमीच कामी येतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएलमधील अलीकडच्या काही सामन्यांचा विचार केला, तर त्यांतील आकडे या दोघांचा खराब फॉर्म दर्शवतात. रोहितवर सध्या मोठी जबाबदारी आहे, पण कोहली मात्र स्वतःच्या फलंदाजीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतो. विराटने सध्या आरसीबीचे आणि भारतीय संघाचे तिन्ही क्रिकेट प्रकारांमधील कर्णधारपद सोडले आहे. यानंतर त्याच्या फलंदाजीत सुधारणा होण्याची अपेक्षा होती, पण अद्याप तसे होताना दिसले नाहीये.
तर दुसरीकडे रोहित शर्माच्या खांद्यावरची जबाबदारी मात्र आता वाढली आहे. रोहित यापूर्वी फक्त मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता, पण आता त्याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद देखील सोपवले गेले आहे. रोहितकडे आता वैयक्तिक प्रदर्शनास भारतीय संघाचाही खेळ सुधरवण्याची जबाबदारी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! आयपीएल सुरू असतानाच कायरन पोलार्डचा धक्कादायक निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम
‘रिषभ पंतने फॉर्ममध्ये येणे खूप गरजेचे, नाहीतर…’, भारताच्या माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया