आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. गुणतालिकेत त्यांचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि प्लेऑफमधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. राजस्थान रॉयल्सला चालू हंगामातील साखळी फेरीचा शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्याच्या आधी राजस्थानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
वेस्ट इंडीजचा दमदार फलंदाज शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. राजस्थान आणि सीएसकेमधील हा सामना शुक्रवारी म्हणजेच २० मे रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हेटमायर ७ मे रोजी पंजाब किंग्जविरुद्धचा सामना खेळल्यानंतर मायदेशात परतला होता. हेटमायर त्याच्या नवजात बाळाला भेटण्यासाठी गयानाला गेला होता. परंतु साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी तो पुन्हा संघाच्या कॅम्पमध्ये हजर झाला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हेटमायर सध्या विलगीकरणात आहे आणि सीएसकेविरुद्धच्या सामन्याआधी तो सराव सत्रात सहभागी होऊ शकतो.
दरम्यानच्या काळात त्याला दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात सहभाग घेता आला नाही. राजस्थानने मेगा लिलावात ८.५ कोटी रुपयांमध्ये हेटमायरला खरेदी केले होते. या वेस्ट इंडीजच्या खेळाडूंने त्याला मिळालेल्या भरघस मानधनाला साजेशे प्रदर्शन करून दाखवले आहे. हंगामात त्याने आतापर्यंत ११ डावांमध्ये २९१ धावा केल्या आहेत. शेवटच्या षटकांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट २१४.२७ राहिला आहे, जो खरोखर उत्कृष्ट आहे
रविवारी (१५ मे) राजस्थानने लखनऊ सुपर जायंट्सला २४ धावांनी धूळ चारली आणि प्लेऑफमधील त्यांचे स्थान जवळपास पक्के केले. या पराभवानंतर लखनऊचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या, तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. राजस्थान आणि लखनऊ संघांनी हंगामात आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांपैकी प्रत्येकी ८ सामने जिंकले आहेत आणि दोन्ही संघांकडे १६-१६ गुण आहेत. परंतु राजस्थान नेट रन रेटच्या जोरावर दुसऱ्या, तर लखनऊ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर गुजरात टायनट्स आहे, ज्यांच्याकडे २० गुण आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात पुजाराची निवड जवळपास पक्की, पण रहाणे…
एकदम कडक! अँडरसनने जबरदस्त स्विंग करत उडवल्या जो रुटच्या दोन दांड्या, Video व्हायरल
‘कठीण परिस्थितीत प्रदर्शन करायला…’, पंजाबविरुद्धचा ‘मॅन ऑफ द मॅच’ शार्दुल ठाकूरची खास प्रतिक्रिया