आयपीएल २०२२ मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल या हंगामात राजस्थानचे प्रतिनिधित्व करत आहे. चहल त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसोबतच मजेशीर अंदाजासाठी ओळखला जोतो. चालू हंगामात देखील त्याने स्वतःच्या प्रदर्शनाने आणि सहकारी खेळाडूंसोबत केलेल्या काही मजेशीर बाबींमुळे चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. अशातच आता त्याने विराट कोहलीचा एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडणार असल्याचे सांगितले. त्याचा हा दावा ऐकून चाहत्यांची चांगलीच करमणूक झाली.
राजस्थान रॉयल्सने काही दिवसांपूर्वी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर आणि फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) एकमेकांच्या विपरीत भूमिकेत म्हणजेच चहल फलंदाजी करताना आणि बटलर गोलंदाजी करताना दिसले होते. या मजेशीर व्हिडिओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स केल्या होत्या. चहलने जेव्हापासून राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये आगमन केले आहे, तेव्हापासून बटलरसोबत त्याची चांगले मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळाले आहे.
आता एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चहलने विराट कोहली (Virat Kohli) याचा आयपीएलमधील अबाधित विक्रम तो स्वतः मोडणार असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला की, “जर मला सलामी करण्याची संधी मिळाली, तर मी फक्त जोस बटलरचाच नाही, तर सर्व विक्रम मोडेल. मला वाटते की, विराट भैयाचा विक्रम (९७३ धावा) देखील माझ्यासाठीच बनला आहे. मी तो विक्रम मोडण्यासाठी निघालो आहे. मी तो विक्रम १० सामन्यांमध्ये तोडेल. कारण मला प्रत्येक सामन्यात शतक करायचे आहे.”
दरम्यान, चालू आयपीएल हंगाम जोस बटलने १३ सामन्यांमध्ये सर्वाधिक ६२७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तीन शतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे, तर दुसरीकडे चहल पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. त्याने आतापर्यंत २४ विकेट्स घेतल्या आहेत. या दोघांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने हंगामात चांगले प्रदर्शन केले आहे. राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत त्यांचा संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि प्लेऑफमध्ये संघाने जागा पक्की केली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकदम कडक! अँडरसनने जबरदस्त स्विंग करत उडवल्या जो रुटच्या दोन दांड्या, Video व्हायरल
मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमारची जागा मिळालेला आकाश मधवाल आहे कोण? जाणून घ्या कामगिरी
पंजाब प्लेऑफमधून जवळपास बाहेर! कर्णधाराने ‘या’ गोष्टीला धरले दिल्लीविरुद्धच्या पराभवासाठी जबाबदार