मागील काही वर्षांमध्ये भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे टी20 क्रिकेटप्रकारात खराब फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र, तो आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना लाजवाब कामगिरी करत आहे. यासह त्याने टीकाकारांची बोलतीही बंद केली आहे. आता त्याला स्ट्राईक बदलण्यातही त्रास होत नाही आणि तो चांगल्या चेंडूंवर पारंपारिक फटके मारून चौकार-षटकारांची बरसातही करत आहे. अशात संघाचे गोलंदाजी सल्लागार एरिक सिमन्स म्हणाले आहेत तकी, अजिंक्य रहाणे स्मार्ट क्रिकेटपटू आहे. त्याने टी20 क्रिकेट प्रकारातही प्रभावीपणे खेळण्याचा मार्ग शोधला आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागील काही वर्षांपूर्वी टी20 क्रिकेटसारख्या प्रकारात संघर्ष करत होता. मात्र, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत तो पूर्ण स्वातंत्र्याने फलंदाजी करत गोलंदाजांची दाणादाण उडवत आहे. यामध्ये त्याने काही पारंपारिक फटक्यांचाही मारा केला आहे. सध्याच्या हंगामात पॉवरप्लेमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 222.22 इतका आहे. एरिक सिमन्स (Eric Simons) यांनी चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद (Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad) संघातील सामन्यापूर्वी भाष्य केले.
ते म्हणाले की, “हे असे काहीसे आहे, जे मला बिल्कुल हैराण करत नाही. मला वाटते की, लोक टी20 क्रिकेटला चुकीचे समजतात. खासकरून फलंदाजीला. हा खेळ खेळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.” पुढे बोलताना एरिक म्हणाले, “आपला मार्ग आणि तुम्ही कोण आहात, हे शोधणे महत्त्वाचे आहे. अजिंक्य रहाणे खूपच हुशार क्रिकेटपटू आहे. त्याने टी20 क्रिकेट खेळण्याचा आपला मार्ग शोधला आहे. तसेच, तो खूपच प्रभावी ठरला आहे.”
रहाणेची हंगामातील कामगिरी
अजिंक्य रहाणे याच्या आयपीएल 2023मधील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याला 3 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने 3 डावात एक अर्धशतकाच्या मदतीने 129 धावा चोपल्या आहेत. आता हैदराबादविरुद्ध रहाणेला संधी मिळते की नाही, आणि मिळाली, तर तो कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. (ipl 2023 csk batsman ajinkya rahane is smart cricketer says eric simons)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला आयपीएलमध्ये शेवटच्या 2-3 वर्षात पंजाबकडून खेळायचं होतं…’, माजी दिग्गजाचा मोठा खुलासा
भारतीयांसाठी मोठी बातमी! इंग्लंडमध्ये यशस्वीरीत्या पार पडली श्रेयस अय्यरची सर्जरी, पण ‘ही’ समस्या कायम