गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्याने इंडियन प्रीमिअर लीग 2023 दिमाखात सुरुवात झाली. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऋतुराज गायकवाड भलताच चमकला. सलामीला उतरलेल्या ऋतुराजने अशी काही वादळी फटकेबाजी केली की, स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या. त्याने गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंंड्या यालाही घाम फोडला. पंड्याच्या गोलंदाजीवर त्याने खणखणीत षटकार मारले. यादरम्यानचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने सलामीला उतरताच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने यादरम्यान तडाखेबंद फटकेबाजी करत अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक ठोकले. हे आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचे पहिले अर्धशतक ठरले. हे अर्धशतक करताना गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारले.
सातव्या षटकात दिसला नजारा
ही घटना सातव्या षटकात घडली. हार्दिक टाकत असलेल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज स्ट्राईकवर होता. त्याने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खणखणीत षटकार मारला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर पुन्हा लाँग ऑफच्या दिशेने चेंडूला दिशा दाखवत सीमारेषेच्या पलीकडे पाठवले. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Rutu running riot raining runs 🥵#TATAIPL is back in town and so are the maximums!#GTvCSK #IPLonJioCinema @Ruutu1331 pic.twitter.com/qRN9unUNR5
— JioCinema (@JioCinema) March 31, 2023
नवव्या षटकात पुन्हा मारले 3 षटकार
ऋतुराज एवढ्यावरच थांबला नाही. त्याने नवव्या षटकातही वादळी फलंदाजी केली. त्याने अल्झारी जोसेफ याच्या पहिल्या चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर खणखणीत षटकार मारले. यानंतरही तो विस्फोटक फलंदाजी करत राहिला.
BOOM 💥@Ruutu1331 hammers two sixes with two beautiful lofted shots 👌🏻👌🏻#TATAIPL | #GTvCSK
WATCH 🎥🔽https://t.co/P6B8OCrjbY pic.twitter.com/TjsxEEf3N4
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
An entertaining 1⃣5️⃣-run over ft. @Ruutu1331 & Moeen Ali 🙌🏻#TATAIPL | #GTvCSK
WATCH now 🎥🔽https://t.co/zgXVJJgg13
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
शतकापासून हुकला ऋतुराज
मात्र, आयपीएल 2023 हंगामातील पहिले शतक करण्यापासून ऋतुराज फक्त 8 धावांनी हुकला. त्याने 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 92 धावा चोपल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 184 इतका होता. त्याला अल्झारी जोसेफने 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शुबमन गिल याच्या हातून झेलबाद करत तंबूत पाठवले.
याव्यतिरिक्त या सामन्यात राजवर्धन हंगरगेकर याने चेन्नईकडून पदार्पण केले. त्याने पदार्पण करताना गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. त्याने यावेळी 3 षटके गोलंदाजी करताना 29 धावा खर्च करत 2 विकेट्स नावावर केल्या होत्या. (ipl 2023 csk vs gt opener ruturaj gaikwad hit back to back sixes on hardik pandya balls see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विसाव्या ओव्हरचा बादशाह धोनीच! आयपीएल कारकीर्दीत त्यानेच ठोकलेत सर्वाधिक षटकार
ऋतुराजच्या बॅटमधून निघाली IPL 2023ची पहिली फिफ्टी, मागील 15 हंगामातील पहिले अर्धशतक करणारे खेळाडू कोण?