---Advertisement---

गुजरातने उडवली रॉयल्सची दाणादाण! 9 विकेट्सने विजय मिळवत टायटन्स टॉपवर

On: शुक्रवार, मे 5, 2023 10:32 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी (5 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावण्याच्या इराद्याने उतरले. मात्र, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर 9 गड्यांनी पराभूत केले. गुजरातचे दोन्ही फिरकीपटू राशिद खान‌‌ व नूर अहमद हे विजयाचे शिल्पकार ठरले.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय लवकरच चुकीचा ठरला. जोस बटलर केवळ आठ धावांवर तंबूत परतला. मागील सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. कर्णधार संजू सॅमसन याने आक्रमक 30 धावा केल्या. मात्र, त्यानंतर राशीद खान व नूर अहमद या फिरकी जोडीने राजस्थानची मधली फळी अक्षरशा कापून काढली. राशीदने तीन तर नूरने दोन बळी आपल्या नावे केले. त्यामुळे राजस्थानचा डाव केवळ 118 धावांवर संपुष्टात आला.

विजयासाठी मिळालेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला शुबमन गिल व वृद्धिमान साहा यांनी 71 धावांची वादळी सुरुवात दिली. गिल बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने 15 चेंडूवर 39 धावांची नाबाद खेळी केली. साहा व पंड्या यांनी संघाचा विजय साकार करत आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले.

(IPL 2023 Gujarat Titans Beat Rajasthan Royals By 9 Wickets Rashid Khan Noor Ahmed Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रवी शास्त्रींनी व्यक्त केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भविष्याबाबत चिंता, म्हणाले, “फुटबॉलसारख्या लीग…”
विराटला ठोठावलेला 1.07 कोटींचा दंड, पण पठ्ठ्या एक रुपड्याही नाही देणार; RCB उचलणार खर्च! कारण वाचाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---