हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर गुरुवारी (दि. 4 मे) आयपीएल 2023चा 47वा सामना पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने-सामने होते. मागील सामन्यात पराभवाचा धक्का सहन करणाऱ्या कोलकाता संघाने या सामन्यात हैदराबादविरुद्ध 5 धावांनी शानदार विजय मिळवला. यासह हंगामातील चौथा विजय काबीज केला. या विजयामुळे केकेआरचा कर्णधार खूपच खुश दिसला. विजयानंतर नितीश राणाने प्रतिक्रिया दिली.
केकेआर संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी यावेळी 20 षटकात 9 विकेट्स गमावत 171 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावत 166 धावाच करता आल्या. केकेआरकडून यावेळी वरुण चक्रवर्ती 4 षटके गोलंदाजी करत 20 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अशाप्रकारे हा सामना केकेआर संघाने 5 धावांनी आपल्या नावावर केला. यावेळी कर्णधार नितीश राणाने सांगितले की, केकेआरने हैदराबादच्या तोंडातून कशाप्रकारे विजय हिसकावून घेतला.
सामन्यानंतर कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) म्हणाला की, “मध्ये आम्ही काही सैल षटके टाकली आणि शार्दुल तसेच वैभवसोबत जुगार खेळला. ते दोघेही सेट फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी राहिले. अशाप्रकारे आम्ही या सामन्यात पुनरागमन केले. आम्हाला त्यांना बाद करावे लागले कारण ते शेवटपर्यंत फलंदाजी करत राहिले असते, तर निश्चितच सामना आमच्या हाताबाहेर निघून गेला असता.”
पुढे बोलताना राणाने सांगितले की, त्याने कशाप्रकारे फिरकीपटूंवर विश्वास दाखवला आणि पुनरागमन केले. त्याने हेही सांगितले की, कशाप्रकारे तो गोलंदाज निवडतो आणि गोलंदाजीतून पुनरागमन करतो. तो म्हणाला की, “मला संशय होता की, मला फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज कोणाचा वापर करायचा आहे. मी माझ्या फिरकीपटूंना हे काम करण्याचा पाठिंबा दिला. मी नेहमी पाहतो की, खेळात सर्वोत्तम फिरकीपटू कोण आहे आणि अशाप्रकारे मी ठरवतो की, त्या दिवशी कुणाला परत आणायचे आहे.”
Varun Chakaravarthy is adjudged Player of the Match for his bowling figures of 1/20 as #KKR snatch a thrilling victory.
Scorecard – https://t.co/dTunuF3Ie4 #TATAIPL #SRHvKKR #IPL2023 pic.twitter.com/UwnB2U6IG7
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2023
चौथा सामना खिशात
खरं तर, या सामन्यामार्फत कोलकाता संघाने स्पर्धेतील आपला चौथा विजय मिळवला. कोलकाता संघ आतापर्यंत 10 सामने खेळला आहे. यामध्ये त्यांनी 6 सामन्यांवर पाणी सोडले आहे. सध्या त्यांचा संघ 8 गुणांसह आणि -0.103 नेट रनरेटसह आठव्या स्थानी आहे. (ipl 2023 kkr vs srh captain nitish rana reaction after winning against sunrisers hyderabad know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केकेआरसमोर सनरायझर्सची हाराकिरी! अखेरच्या षटकात 9 धावांचा बचाव करत चक्रवर्ती ठरला हिरो
सनरायझर्स हैदराबादचे 13.25 कोटी पाण्यात! आयपीएल हंगामातील ब्रुकची आकडेवारी लाजीरवाणी