शनिवारी (दि. 20 मे) लखनऊ सुपर जायंट्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ईडन गार्डन्समध्ये 1 धावेने विजय मिळवला. यासह आयपीएल 2023च्या प्ले-ऑफमध्येही थाटात प्रवेश केला. असे असले, तरीही या सामन्यातील एका घटनेची चर्चा होत असून दरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ती घटना म्हणजेच नवीन उल हक याला डिवचण्यासाठी स्टेडिअममध्ये बसलेल्या चाहत्यांनी ‘कोहली कोहली‘ नावाने केलेला आरडाओरडा होय.
झाले असे की, केकेआरच्या डावातील दुसऱ्या षटकात नवीन उल हक (Naveen ul Haq) गोलंदाजी करण्यासाठी आला होता. यावेळी ईडन गार्डन्समध्ये बसलेल्या चाहत्यांनी जोरजोरात कोहली कोहली (Kohli Kohli) ओरडण्यास सुरुवात केली. यावेळी नवीनने काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, नंतर जेव्हा यश ठाकूर याने रहमानुल्लाह गुरबाज याला तंबूचा रस्ता दाखवला, तेव्हा अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हक केकेआरच्या चाहत्यांना शांत राहण्याचा इशारा करताना दिसला.
Naveen Ul Haq shows silence gesture to the Eden Gardens crowd. pic.twitter.com/8znGrQLT1n
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 20, 2023
असाच काहीसा इशारा गौतम गंभीर याने बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या आरसीबीच्या चाहत्यांना केला होता. याचे उत्तर विराट कोहली (Virat Kohli) याने 1 मे रोजी इकाना स्टेडिअममध्ये दिले होते. या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. त्यामध्ये नवीन उल हक याचाही समावेश होता. दोन्ही संघांच्या हातमिळवणीवेळी नवीनने विराटचा हात झटकला होता. या घटनेनंतर विराटचे चाहते नवीनला चिडवण्याची एकही संधी हातातून जाऊ देत नाहीत.
Eden Gardens crowd chanting 'Kohli, Kohli' on Naveen Ul Haq bowling. pic.twitter.com/WjibEQbiNr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 20, 2023
नवीन उल हक आणि विराट कोहली (Naveen ul Haq And Virat Kohli) यांच्यातील वादाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. नवीनही अनेकदा इंस्टाग्राम स्टोरीमार्फत टीकाकारांना उत्तर देताना दिसला आहे.
दुसरीकडे, आयपीएल 2023 स्पर्धेतील 3 प्ले-ऑफ (IPL 2023 Play-offs) संघ पक्के झाले आहेत. त्यामध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचाही समावेश आहे. लखनऊने कोलकाताला पराभूत करत अव्वल चारमध्ये आपली जागा पक्की केली. क्वालिफायर1 सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात 23 मे रोजी होईल. त्यानंतर 24 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स संघ एलिमिनेटर सामना खेळेल. (ipl 2023 kohli kohli slogans were raised in eden gardens then cricketer naveen ul haq did this see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आख्ख्या देशाला माहितीये…’, रिंकूचे कौतुक करताना मोठी गोष्ट बोलून गेला कॅप्टन नितीश राणा
नवीनच्या ओव्हरमध्ये रिंकूचे तांडव! ठोकला थेट 110 मीटर लांबीचा सिक्स, गोलंदाजाने रडल्यासारखं केलं तोंड